Skip to content

Backsliding बद्दल बायबलमधील वचने: Guilt and consequences of

3 वचने · 25 पैलू

Guilt and consequences of बद्दल वचने

  1. याकारणास्तव न्याय आमच्यापासून लांब असतो, आणि धार्मिकतेचा आम्हाला बोध मिळत नाही. आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो, पण सर्वत्र अंधकारच असतो; तेजस्वीपणाची अपेक्षा करतो, पण गडद सावलीत चालतो.

  2. आंधळ्याप्रमाणे आम्ही भिंती लगत चाचपडत चालतो, दृष्टिहीनांप्रमाणे स्पर्शाद्वारे मार्ग चाचपडतो. मध्यान्हात आम्ही संधिप्रकाशात असल्याप्रमाणे अडखळतो; बलवानांमध्ये आम्ही मेलेल्यांसारखे असतो.

  3. आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो; कबुतरांप्रमाणे शोकाने हुंकारतो. आम्ही न्यायाचा शोध घेतो, पण तो सापडत नाही; सुटकेसाठी धडपडतो, पण ती फार दूर गेलेली असते.