- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Avenger of Blood बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
कारण तुम्ही मला माझ्या शेतातून हद्दपार केले आहे आणि तुमच्या सानिध्यापासून दूर केले आहे; मी पृथ्वीवर बेचैन असा भटकणारा होईन, जो कोणी मला पाहील, तो मला ठार करेल.”
यावर याहवेहने त्याला उत्तर दिले, “असे होणार नाही, जर कोणी काईनाचा जीव घेईल, तर त्याला मी तुला दिलेल्या शिक्षेपेक्षा सातपट शिक्षा देईन” आणि मग त्याचा वध कोणीही करू नये, असा इशारा देणारी एक खूण याहवेहने काईनावर केली.
आणि मी तुझ्या जीवनदायी रक्ताचा जाब निश्चितच मागेन. जो कोणी एखाद्या मनुष्याचा वध करेल, त्या प्रत्येक पशूकडून मी जीवनाचा जाब घेणार. प्रत्येक मनुष्याकडून दुसर्या मनुष्याच्या वधाचा मी जाब घेणार.
“जो कोणी मनुष्याचे रक्त वाहील, मनुष्याद्वारेच त्याचा रक्तपात करण्यात येईल; कारण परमेश्वराने आपल्या प्रतिरूपात मानवाला निर्माण केले आहे.
रक्ताचा सूड घेणार्याने त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; जेव्हा सूड घेणार्याला खुनी मनुष्य सापडेल; सूड घेणार्याने खुनी मनुष्याला जिवे मारावे.
जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले
किंवा जर वैरभावाने एखाद्याला बुक्की मारली व तो मेला, तर त्या व्यक्तीला मारून टाकले जावे; कारण तो खुनी आहे. रक्ताचा सूड घेणारा जेव्हा त्या खुनी व्यक्तीला भेटेल तेव्हा त्याने त्याला अवश्य जिवे मारावे.
“ ‘पण काही शत्रुत्व नसताना अचानक कोणी एखाद्याला ढकलतो किंवा चुकीने त्यांच्यावर एखादी वस्तू फेकतो
किंवा न पाहताच त्यांना मारून टाकू शकेल असा जड दगड त्यांच्यावर टाकेल, व तो व्यक्ती जर मेला, परंतु ज्याने मारले तो त्याचा शत्रू नव्हता व त्याने ती हानी मुद्दाम केली नाही,
म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा.
खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंडळीने रक्ताचा सूड घेणार्यापासून वाचवावे व तो ज्या आश्रयाच्या नगराकडे पळून गेला होता त्याकडे त्याला पाठवावे. पवित्र तेलाने अभिषेक झालेल्या मुख्य याजकाचा मृत्यू होईपर्यंत आरोपी मनुष्याने तिथेच राहावे.
“ ‘परंतु आरोपी ज्या आश्रय नगरात पळून गेला आहे त्याच्या सीमेबाहेर गेला
आणि रक्ताचा सूड घेणार्याला तो शहराच्या बाहेर सापडला आणि रक्ताचा सूड घेणार्याने त्याला जिवे मारले तर त्या खुनासाठी तो दोषी ठरणार नाही.
कारण आरोपीने त्या आश्रयाच्या नगरात महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहिले पाहिजे; महायाजकाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे.
“ ‘हे सर्व तुमच्या येणार्या पिढ्यांसाठी तुम्ही जिथे वस्ती कराल तिथे तुमच्या न्यायाचे नियम म्हणून असावे.
जो कोणी एखाद्या व्यक्तीची हत्या करतो आणि आश्रयाच्या नगरात पळून जातो, त्याच्यासाठी हे नियम असावे: एखाद्या मनुष्याने मनात काहीही द्वेष नसताना व हेतुपुरस्सर नव्हे, पण चुकून त्याच्या शेजार्याचा वध केला.
एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.
नाही तर, अशा रक्तपाताबद्दल सूड घेणारा संतापाने त्याचा पाठलाग करेल व मार्ग लांब असल्याने त्याला वाटेत गाठून ठार मारेल. त्याला मृत व्यक्तीबद्दल द्वेष नव्हता व त्याने पूर्वनियोजित केल्याशिवाय आपल्या शेजार्याशी हे कृत्य केले, तो प्राणदंडाच्या शिक्षेस पात्र नव्हता.
म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तीन शहरे निवडून ती वेगळी करून ठेवावी.
याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तुमच्या देशाच्या सीमांचा विस्तार करून संपूर्ण देश तुम्हाला दिला,
कारण मी आज तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन केले—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती केली व त्यांच्या मार्गात आज्ञाधारकपणे चाललात—तर तुम्ही आणखी तीन शहरे निवडावीत.
हे करावे, अशा रीतीने याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देत असलेल्या भूमीवर निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याचा दोष तुमच्यावर येणार नाही.
परंतु कोणी द्वेषाने दबा धरून राहील व आपल्या शेजार्यावर अचानक प्राणघातक हल्ला करून त्याला ठार करेल आणि मग यापैकी एखाद्या शहरात पळून जाईल,
तर त्या गावाच्या वडील मंडळीने माणसे पाठवून त्याला धरून आणावे व त्याला वध झालेल्या माणसाच्या रक्तपाताचा सूड घेणार्याच्या स्वाधीन करावे.
त्याला दया दाखवू नये. इस्राएलास निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याच्या दोषापासून शुद्ध करावे, म्हणजे तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल.