Altars बद्दल बायबलमधील वचने: Of Ahaz
Of Ahaz बद्दल वचने
मग आहाज राजा तिग्लथ-पिलेसर अश्शूरच्या राजाला भेटावयास दिमिष्क येथे गेला. त्याने दिमिष्क येथे एक वेदी पाहिली आणि त्याने, तिचा आकार व आराखडा तयार करून तो उरीयाह याजकाकडे पाठवून दिला.
आहाज राजाने दिमिष्क येथून पाठविलेल्या सर्व आराखड्यानुसार उरीयाह याजकाने एक वेदी बांधली आणि राजा आहाज परत येण्यापूर्वी ती पूर्ण केली.
जेव्हा राजा दिमिष्क येथून परत आला आणि त्याने वेदी पाहिली, तो वेदीजवळ गेला आणि त्यावर त्याने अर्पण सादर केले.