मुख्य मजकुरावर जा

Agency बद्दल बायबलमधील वचने

37 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अहज्याहची यहोरामाशी भेट यामधून परमेश्वराने अहज्याहचा नाश केला. जेव्हा अहज्याह तिथे आला तेव्हा तो योरामबरोबर निमशीचा पुत्र येहूला भेटण्यासाठी गेला, ज्याला अहाबाच्या घराण्याचा नाश करण्यासाठी याहवेह यांनी अभिषेक केला होता.

  2. हे याहवेह, उठा, त्यांचा सामना करा, त्यांचा नाश करा; तुमच्या तलवारीने दुष्टांपासून माझा बचाव करा.

  3. याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा, ज्यांना याच जीवनात प्रतिफळ आहे. जी शिक्षा तुम्ही दुष्टांसाठी साठवून ठेवलेली आहे त्यानेच त्यांचे पोट भरो, त्यांची संततीही तेच आधाशीपणे खाओ, आणि त्यांचे उरलेले पुढच्या संततीलाही मिळो.

  4. “अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!

  5. मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.

  6. ते फार दूर देशातून येतात, आकाशाच्या शेवटच्या टोकापासून— याहवेह आणि त्यांच्या क्रोधाची शस्त्रे संपूर्ण देशाचा नाश करण्यासाठी येतात.

  7. “पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल.

  8. “ ‘ “जर कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही, असे याहवेह घोषित करतात.

  9. “तू माझ्या युद्धाचा सोटा आहेस. माझे युध्दशस्त्र— तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना डळमळीत करेन, तुझ्याद्वारे मी राज्ये नष्ट करेन,

  10. तुझ्याद्वारे मी घोडा आणि घोडेस्वाराचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी रथ आणि सारथी यांचा संपूर्ण नाश करेन,

  11. तुझ्याद्वारे मी पुरुष व स्त्रीचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी वृद्धाचा व तरुणाचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी तरुण व तरुणींचा संपूर्ण नाश करेन,

  12. तुझ्याद्वारे मी मेंढपाळांचा आणि कळपांचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी शेतकर्‍यांचा आणि बैलांचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी राज्यपालांचा आणि अधिपतींचा संपूर्ण नाश करेन.