Abner बद्दल बायबलमधील वचने: Captain of the host
Captain of the host बद्दल वचने
त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता.
शौलाने दावीदाला पलिष्ट्याशी युद्ध करण्यास जाताना पाहिले, तेव्हा त्याने सेनापती अबनेर याला विचारले, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे?” अबनेरने उत्तर दिले, “महाराज चिरायू होवो, मला माहीत नाही.”
नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता.
दावीदाने सैन्याला आणि नेरचा पुत्र अबनेर यांना मोठ्याने विचारले, “अबनेर, तू मला उत्तर देणार नाहीस काय?” अबनेरने उत्तर दिले, “तू कोण आहेस, राजाला कोण हाक मारत आहे?”