मुख्य मजकुरावर जा

Jehoiakim

37 वचने · 7 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Eliakim

Jehoiakim चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले:

  2. योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.

  3. “दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ.

  4. याशिवाय यहूदीयाचा राजा यहोयाकीमला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू ते चर्मपत्र जाळले व म्हटले, “बाबेलचा राजा निश्चितच येईल व हा देश नष्ट करेल आणि मनुष्य व पशूंना पूर्णपणे नाहीसे करेल, असे त्या चर्मपत्रावर का लिहिले?”

  5. म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील.

  6. मग यिर्मयाहने पुन्हा दुसरे चर्मपत्र घेतले, यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळलेल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूखाला पुन्हा सांगून त्याच्याकडून लिहून घेतली. आणि त्यासारख्या आणखी पुष्कळ वचनाची त्यामध्ये भर घातली गेली.

  7. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहोयाकीमचा पुत्र कोन्याह याची यहूदीयाचा नवा राजा म्हणून नेमणूक केली नाही. त्याऐवजी त्याने योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याची निवड केली.

  8. यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:

  9. इजिप्तसंबंधी: योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीशच्या लढाईत इजिप्तचा राजा फारोह नखो व त्याचे सैन्य यांचा पराभव केला. त्या प्रसंगी इजिप्तच्या सेनेविरुद्ध हा संदेश देण्यात आला.

  10. यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  11. यहूदीयाचा राजा यहोयाकीमच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमला वेढा दिला.

  12. आणि प्रभूने यहूदीयाच्या राजा यहोयाकीमला परमेश्वराच्या मंदिरातील काही पात्रांसोबत त्याच्या हाती दिले. ती शिनार प्रांतातील त्याच्या दैवताच्या मंदिरासाठी नेली आणि त्याच्या दैवताच्या खजिन्यात नेऊन ठेवली.