- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
योहान११
Listen to this chapter
0:00
0:00
लाजर आजारी; येशूचा विलंब
१
आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता.
२
ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते.
३
तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.”
४
येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.”
५
मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती,
६
तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तिथेच अधिक दोन दिवस राहिले.
७
यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “चला आपण परत यहूदीयात जाऊ.”
८
परंतु शिष्य म्हणाले, “गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तिथे जाता काय?”
९
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते.
१०
जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो.”
११
असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.”
१२
त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभूजी तो झोपला असेल, तर बरा होईल.”
१३
येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत.
१४
मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे,
१५
तुमच्यासाठी मी तिथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”
१६
परंतु दिदुम म्हटलेला थोमा इतर शिष्यांना म्हणाला, “चला, आपणही त्यांच्याबरोबर मरू.”
पुनरुत्थान व जीवन मीच आहे
१७
ते तिथे पोहोचल्यावर, येशूंना समजले की, लाजराला कबरेत ठेऊन चार दिवस झाले होते.
१८
बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते.
१९
आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.
२०
येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली.
२१
“प्रभूजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.
२२
परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते आपणास ते देतील हे मला ठाऊक आहे.”
२३
त्यावर येशूंनी तिला सांगितले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
२४
मार्था म्हणाली, “होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल.”
२५
येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल;
२६
जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?”
२७
“होय, प्रभूजी,” ती म्हणाली, “या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसिहा), परमेश्वराचे पुत्र आपण आहात यावर माझा विश्वास आहे.”
२८
ती असे बोलल्यानंतर परत गेली व आपली बहीण मरीयेला बाजूला बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला विचारत आहेत.”
२९
मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली.
३०
येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जिथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते.
३१
जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले.
३२
येशू जिथे होते तिथे मरीया पोहोचल्यावर त्यांना पाहून ती त्यांच्या पाया पडली व त्यांना म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.”
३३
येशूंनी तिला असे रडताना आणि जे यहूदी तिच्याबरोबर होते त्यांना शोक करताना पाहिले, तेव्हा ते आत्म्यामध्ये व्याकूळ व अस्वस्थ झाले.
३४
येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, या आणि पाहा.”
३५
येशू रडले.
३६
नंतर यहूदी म्हणाले, “पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!”
३७
परंतु काहीजण म्हणाले, “ज्याने आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडले, ते या मनुष्याला मरणापासून वाचवू शकले नाहीत का?”
लाजरला मरणातून उठवणे
३८
येशू पुन्हा व्याकूळ होऊन कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती.
३९
येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.” मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.”
४०
तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?”
४१
यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो.
४२
मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.”
४३
हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!”
४४
लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते. येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.”
येशूला ठार मारण्याचा कट
४५
यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला.
४६
परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले.
४७
मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे.
४८
जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”
४९
त्यांच्यापैकी कयफा नावाचा मनुष्य त्या वर्षी महायाजक होता, तो म्हणाला, “तुम्हाला काहीच माहीत नाही!
५०
तुम्ही हे देखील लक्षात आणत नाही की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होणे यापेक्षा लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे तुमच्या हिताचे आहे.”
५१
हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत,
५२
हे केवळ इस्राएली राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव.
५३
मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला.
येशू माघार घेतो; वल्हांडण जवळ येते
५४
यामुळे येशू यहूदीया प्रांताच्या लोकांमध्ये उघडपणे फिरले नाहीत. तर त्याऐवजी ते अरण्याच्या जवळ असलेल्या एफ्राईम नावाच्या एका गावी आपल्या शिष्यांसह जाऊन राहिले.
५५
जेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला, तेव्हा सण सुरू होण्यापूर्वी शुद्धीकरणाचा विधी पार पाडावा म्हणून देशातील अनेक लोक वर यरुशलेममध्ये आले होते
५६
येशूंना ते शोधत होते, मंदिराच्या अंगणात उभे राहून ते एकमेकांना विचारीत होते, “तुम्हाला काय वाटते? तो वल्हांडण सणाला येणारच नाही काय?”
५७
इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Options
Study Note