स्तोत्रसंहिता ४४:९-२२
९
परंतु आता तुम्ही आम्हाला टाकले आहे व आमची फजिती केली; आमच्या सैन्यासोबत तुम्ही जात नाही.
१०
तुम्ही आम्हास शत्रूंपुढे पाठ फिरविण्यास लावले आहे, आणि आमचा द्वेष करणारे आम्हाला लुटतात.
११
तुम्ही आम्हाला मेंढराप्रमाणे नष्ट होण्यासाठी सोडून दिले, आणि राष्ट्रांमध्ये आमची पांगापांग केली.
१२
तुम्ही आम्हाला कवडीमोलाने विकले; तुम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नाही.
१३
तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात.
१४
तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये उपहास असे केले आहे; लोक आमच्याकडे पाहून डोके हालवितात.
१५
सर्व दिवस मी अपमानित राहतो, आणि लज्जेने माझा चेहरा झाकला आहे.
१६
टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्या शब्दामुळे, शत्रू आणि सूड उगवणार्यांमुळे माझी विटंबना होते.
१७
आमच्यावर हे प्रसंग आले असताना आम्ही तुम्हाला विसरलो नाही; आम्ही तर तुमचा करार मोडलेला नव्हता.
१८
आम्ही तुम्हाला सोडले नाही; तुमच्या मार्गातून आमचे पाय ढळले नाही.
१९
पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले. तुम्ही आम्हाला सर्वात गडद अंधारात लपविले आहे.
२०
जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो, किंवा अन्य दैवतांपुढे हात पसरविले असते,
२१
तर परमेश्वराला ते समजले नसते काय? कारण हृदयातील प्रत्येक गुप्त विचार त्यांना माहीत असतात.
२२
तरी तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो; वधाची प्रतीक्षा करणार्या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.
Settings