मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११९:४९-५६

जाईन: देवाच्या अभिवचनाद्वारे संकटात सांत्वन

स्तोत्रसंहिता ११९:४९-५६
४९
तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा, कारण तुम्हीच मला आशा दिली आहे;
५०
माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.
५१
गर्विष्ठ लोक निर्दयपणे माझा उपहास करतात, तरी मी तुमच्या नियमशास्त्रापासून ढळत नाही.
५२
याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो, व त्यापासून माझे सांत्वन होते.
५३
संताप मला व्यापून टाकतो, कारण त्या दुष्टांनी तुमच्या आज्ञा धिक्कारल्या आहेत.
५४
मी कुठेही राहिलो तरी, तुमचे नियम माझ्या गीतांचे विषय झाले आहेत.
५५
हे याहवेह, मी रात्रीही तुमचे नामस्मरण करतो, जेणेकरून तुमच्या आज्ञा मी सतत पाळीन.
५६
तुमच्या आज्ञांचे पालन करणे: माझा परिपाठ झाला आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options