स्तोत्रसंहिता ११९:५७-६४
५७
याहवेह, तुम्ही माझा वाटा आहात; तुमचे नियम पालन करण्याचे मी वचन दिले आहे.
५८
पूर्ण हृदयाने मी तुमचे मुख पाहण्याचा प्रयास करतो; आपल्या अभिवचनाप्रमाणे तुम्ही माझ्यावर कृपा करा.
५९
माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला, आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत.
६०
मी त्वरा करेन, आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन.
६१
दुष्टांनी मला दोरखंडाने बांधले तरीही, मी तुमचे नियम विसरणार नाही.
६२
मी मध्यरात्रीही उठून तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल तुमची उपकारस्तुती करेन.
६३
माझी मैत्री त्या सर्वांशी आहे, जे तुमचे भय धरतात व तुमचे आज्ञापालन करतात.
६४
हे याहवेह, तुमच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तुमचे नियम मला शिकवा.
Settings