मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे १७:७-१४

ज्ञानी व मूर्ख यांतील विरोधाभास

नीतिसूत्रे १७:७-१४
वक्तृत्वपूर्ण भाषण देवहीन मूर्खाला शोभत नाही— राजाने खोटे बोलणे कितीतरी अशोभनीय आहे!
लाच देणार्‍या माणसासाठी ती जादूच्या रत्नासारखी आहे; त्यांना वाटते की त्याने त्यांची कामे यशस्वी होतील.
जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात.
१०
मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा विवेकी मनुष्याला रागावून बोललेला एक शब्द अधिक प्रभावी असतो.
११
वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात; मृत्यूचा दूत त्यांच्याकडे पाठविण्यात येईल.
१२
जिची पिल्ले पळवून नेली आहेत त्या अस्वलीची तिची भेट झालेली चालेल, परंतु मूर्खपणाचा अट्टाहास करणाऱ्या मूर्खाची भेट नको.
१३
जो चांगल्याची फेड वाईटाने करतो, त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही.
१४
भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options