Skip to content
नीतिसूत्रे १७:१५-२२

नीतिसूत्रे १७:१५-२२

१५
दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे— अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात.
१६
जर ते समजू शकत नाहीत तर ज्ञानवर्धनासाठी मूर्खाच्या हातात पैसे का असावेत?
१७
खरा मित्र नेहमीच प्रेम करतो; आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो.
१८
जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्‍याच्या कर्जफेडीची हमी घेतो, तो विवेकहीन मनुष्य आहे.
१९
जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.
२०
ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही; ज्याची जीभ विकृत भाषण करते, तो संकटात पडतो.
२१
जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो, आणि देवहीन मूर्खाच्या पालकांना आनंद मिळत नाही.
२२
आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, पण खिन्न मन हाडे शुष्क करते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options