Skip to content
मत्तय १३:५३-५८

नासरेथमध्ये नकार

मत्तय १३:५३-५८

नासरेथमध्ये नकार

५३
येशूंनी हे दाखले सांगण्याचे संपविल्यावर ते तिथून निघाले.
५४
स्वतःच्या गावी येऊन, तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे ज्ञान व चमत्कार करण्याचे सामर्थ्य कुठून प्राप्त झाले?
५५
हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय?
५६
याच्या सर्व बहिणी आपल्यातच नाहीत का? मग या मनुष्याला या सर्वगोष्टी कुठून प्राप्त झाल्या?”
५७
आणि ते त्याच्यावर संतापले. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “संदेष्ट्याचा मान होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर यांच्यात तो मान्यता पावत नाही.”
५८
आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी त्या ठिकाणी फार चमत्कार केले नाहीत.

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • मार्क ६:६

    त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले. मग येशू गावोगावी शिक्षण देत फिरले.
    वचन ५४ मधून
  • योहान ६:४२

    ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?”
    वचन ५५ मधून
  • योहान ४:४४

    कारण येशूंनी स्वतः स्पष्टपणे सांगितले होते की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.
    वचन ५७ मधून
  • मार्क ६:५

    काही आजार्‍यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तिथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत.
    वचन ५८ मधून
  • मार्क ६:३

    हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले.
    वचन ५५ मधून
  • मत्तय ११:६

    जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
    वचन ५७ मधून
  • लूक ४:२४

    “पण मी तुम्हाला निश्चित सांगतो,” ते पुढे म्हणाले, “संदेष्ट्याला स्वतःच्या गावी सन्मान मिळत नाही.
    वचन ५७ मधून
  • लूक ३:२३

    येशूंनी आपले कार्य सुरू केले, त्यावेळी ते सुमारे तीस वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव योसेफ आहे, असे लोक समजत असत. योसेफ हा एलीचा पुत्र होता.
    वचन ५५ मधून
  • रोमकरांस ११:२०

    ठीक आहे. त्या फांद्या अविश्वासामुळे तोडण्यात आल्या, आणि तुम्ही केवळ विश्वासामुळे उभे आहात. तेव्हा अहंकारी होऊ नका पण भयभीत व्हा.
    वचन ५८ मधून
  • मत्तय ७:२८

    येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले.
    वचन ५३ मधून
  • योहान ७:१५

    जे यहूदी तिथे होते ते चकित झाले आणि विचारू लागले, “हा मनुष्य शिकला नसून हे ज्ञान त्याला कसे प्राप्त झाले?”
    वचन ५४ मधून
  • योहान ७:१६

    येशू त्यांना म्हणाले, “माझी शिकवण माझी स्वतःची नसून ज्यांनी मला पाठविले त्यांची आहे.
    वचन ५४ मधून
All Matthew Sites (Jerusalem)
All Matthew Sites (Jerusalem) View full PDF
Matthew 13:54-58, Matthew 14:13-20
Matthew 13:54-58, Matthew 14:13-20 View full PDF
All Matthew Sites (Levant)
All Matthew Sites (Levant) View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options