Skip to content
विलापगीत ४:१-१२

विलापगीत ४:१-१२

सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, उत्तम सोने निस्तेज झाले आहे! पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात विखुरली आहेत.
सुवर्णतुल्य असलेल्या, सीयोनाच्या लेकरांना, आता कुंभाराच्या हातांनी घडविलेल्या मातीच्या पात्रांप्रमाणे लेखले जात आहे!
कोल्हीदेखील आपल्या पिलांना स्तनपान करते, पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे निर्दयी झाले आहेत.
तहानेमुळे शिशूंच्या जिभा टाळूला चिकटल्या आहेत; भाकरीसाठी लेकरे याचना करीत आहेत, पण त्यांना कोणीही देत नाही.
उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत.
माझ्या लोकांची शिक्षा सदोमापेक्षाही घोर झाली आहे, ज्यांना इतर कोणी मदत करण्याआधी त्यांचा एका क्षणात नायनाट झाला.
त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.
पण आता ते चेहरे काजळीपेक्षा काळेकुट्ट झाले आहेत; त्यांना वाटेत कोणी ओळखू शकत नाही. त्यांची कातडी हाडांना चिकटली आहे; ती काठीसारखी शुष्क झाली आहे.
उपासमारीने हळूहळू मरण्यापेक्षा तलवारीने मरणारे फार बरे; कारण शेतातील उपज नसल्यामुळे भुकेपायी व्याकूळ होऊन ते क्षय पावतात.
१०
करुणामयी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने आपलीच मुले-बाळे शिजविली, जेव्हा माझ्या लोकांचा नायनाट झाला, ती त्यांचे अन्न बनली.
११
याहवेहने त्यांच्या क्रोधास निर्बंध सोडले आहे; त्यांचा अत्यंत भयानक क्रोध ओतला गेला आहे. त्यांनी सीयोनमध्ये अग्नी पेटविला त्या अग्नीने तिच्या पायांना भस्म करून टाकले आहे.
१२
यरुशलेमच्या वेशीतून आत एखादा शत्रू वा विरोधी शिरू शकेल, यावर संपूर्ण पृथ्वीवरील राजांनी तसेच जगातील कोणत्याही लोकांनी विश्वास ठेवला नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options