विलापगीत ३:५५-६६
५५
याहवेह, त्या खोल डोहातून मी तुमच्या नावाचा धावा केला,
५६
तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.”
५७
मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”
५८
हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला; तुम्ही माझ्या जीवनाची खंडणी दिली.
५९
याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा!
६०
तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे.
६१
याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान—
६२
माझे शत्रू माझ्याविरुद्ध दिवसभर काय बोलतात व काय कुजबुजतात, हे सर्व तुम्ही ऐकले आहे.
६३
त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून, ते माझ्या उपहासाची गाणी गातात.
६४
हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या.
६५
त्यांच्या हृदयावर आवरण टाका, तुमचा शाप त्यांच्यावर पडो!
६६
क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा.
Settings