Skip to content
यहोशुआ २१:२१-४५

यहोशुआ २१:२१-४५

२१
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्यांना दिलेली नगरे ही: शेखेम (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) आणि गेजेर,
२२
किबसाईम आणि बेथ-होरोन ही त्यांच्या कुरणांसह एकूण चार नगरे.
२३
दानच्या गोत्राकडून त्यांना मिळालेली नगरे ही: एल्तेकेह, गिब्बथोन,
२४
अय्यालोन व गथ-रिम्मोन; त्यांच्या कुरणासह ही चार नगरे होती.
२५
मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: तानख व गथ-रिम्मोन त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे.
२६
ही सर्व एकूण दहा नगरे व त्यांची कुरणे राहिलेल्या कोहाथी कुळाला मिळाली.
२७
लेवी कुळातील गेर्षोनाच्या गोत्राला: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: बाशानातील गोलान (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) व बीशतेराह त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे देण्यात आली.
२८
इस्साखारच्या गोत्राकडून: किशोन, दाबरथ,
२९
यर्मूथ व एन-गन्नीम व त्यांच्या कुरणासह चार नगरे देण्यात आली.
३०
आशेरच्या गोत्राकडून: मिशाल, अब्दोन,
३१
हेलकथ व रहोब ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली;
३२
नफतालीच्या गोत्राकडून: गालीलातील केदेश (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), हम्मोथ-दोर व करतान ही तीन नगरे त्यांच्या कुरणासह देण्यात आली.
३३
गेर्षोन कुळाच्या वाट्याला तेरा नगरे व त्यांची कुरणे आली.
३४
मरारी कुळास (बाकीच्या लेवी गोत्राला): जबुलूनच्या गोत्राकडून: योकनाम, करताह,
३५
दिमनाह व नहलाल ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.
३६
रऊबेनच्या गोत्राकडून: बेसेर, याहसाह,
३७
केदेमोथ व मेफाथ ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली.
३८
गादच्या गोत्राकडून: गिलआद मधील रामोथ (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), महनाईम,
३९
हेशबोन व याजेर ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.
४०
लेवीच्या उर्वरित कुळांना, म्हणजे मरारी कुळास एकूण बारा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.
४१
इस्राएली लोकांच्या हद्दीत लेवी लोकांची सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची कुरणे होती.
४२
यातील प्रत्येक नगराच्या सभोवती कुरणे होती. असेच सर्व नगरांचे होते.
४३
याप्रमाणे याहवेहने इस्राएलाच्या पूर्वजांना जो देश देण्याची शपथ घेतली होती, तो सर्व त्यांना दिला आणि त्यांनी त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती केली.
४४
याहवेहने त्यांच्या पूर्वजांना शपथ दिल्याप्रमाणे त्यांना सर्वस्वी विसावा दिला. त्यांचा एकही शत्रू त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही; याहवेहने इस्राएली लोकांच्या प्रत्येक शत्रूला त्यांच्या हाती दिले.
४५
याहवेहने इस्राएली लोकांना दिलेली जी चांगली अभिवचने होती त्यातील एकही निष्फळ झाले नाही; त्यातील प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options