Skip to content
योनाह ३:६-९

योनाह ३:६-९

जेव्हा योनाहची चेतावणी निनवेहच्या राजापर्यंत पोहोचली, तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला, आपली राजवस्त्रे काढून बाजूला ठेवली व गोणपाट परिधान करून तो राखेत जाऊन बसला.
त्याने निनवेहमध्ये ही घोषणा केली: “राजा आणि त्याच्या सरदारांच्या आदेशानुसार: “कोणत्याही मनुष्याने किंवा पशूने, गुरे किंवा मेंढरांनी, काहीही चाखू नये; त्यांनी काहीही खाऊ किंवा पिऊ नये.
पण मनुष्याने आणि प्राण्याने गोणपाट घालावे. प्रत्येकाने त्वरित परमेश्वराचा धावा केला करावा आणि आपली वाईट कृत्ये आणि हिंसाचार सोडावा.
कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • 2 शमुवेल १२:२२

    त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’
    वचन ९ मधून
  • एस्तेर ४:१

    जेव्हा मर्दखयाला समजले, ज्या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून, गोणपाट नेसून, अंगाला राख फासून व बाहेर शहरात जाऊन मोठमोठ्याने व अतिशय दुःखाने विलाप केला.
    वचन ६ मधून
  • एस्तेर ४:४

    एस्तेरच्या दासींनी आणि खोजांनी येऊन तिला मर्दखयाबद्दल सांगितले, तेव्हा ती अतिशय खिन्न झाली. मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्रे घालावी म्हणून तिने त्याच्याकडे वस्त्रे पाठविली, परंतु त्याने ते घेण्याचे नाकारले.
    वचन ६ मधून
  • याकोब ४:६

    परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”
    वचन ६ मधून
  • याकोब ४:१०

    प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील.
    वचन ६ मधून
  • 2 इतिहास २०:३

    धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली.
    वचन ७ मधून
  • योएल २:१३

    तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.
    वचन ९ मधून
  • योएल २:१४

    कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील आणि तुमच्यासाठी एक आशीर्वाद सोडतील— मग याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही धान्यार्पण व पेयार्पण करू शकाल.
    वचन ९ मधून
  • योएल १:१८

    गुरे कशी कण्हत आहेत! शेरडामेंढरांचे कळप व्याकूळ झाले आहेत, कारण त्यांना चरण्यासाठी कुरणेच नाहीत; मेंढ्यांचे कळप विव्हळत आहेत.
    वचन ७ मधून
  • योएल २:१५

    सीयोनात कर्णा वाजवा! पवित्र उपास घोषित करा पवित्र सभा बोलवा.
    वचन ७ मधून
  • योएल २:१६

    लोकांना एकत्र करा, सभेला पवित्र करा; वडिलजनांना एकत्र आणा, बालकांना आणि स्तनपान करणार्‍या अर्भकांना देखील एकत्र आणा. वराला त्याच्या निवासस्थानातून आणि वधूला तिच्या खोलीतून बोलवा.
    वचन ७ मधून
  • योनाह ३:५

    तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.
    वचन ७ मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options