Skip to content
योहान १०:४०-४२

परेयात माघार आणि वाढता विश्वास

योहान १०:४०-४२

परेयात माघार आणि वाढता विश्वास

४०
मग येशू यार्देन नदीच्या पलीकडे जिथे योहान आरंभीच्या दिवसात बाप्तिस्मा करीत असे, त्या ठिकाणी जाऊन राहिले.
४१
आणि त्यांच्याकडे अनेक लोक आले. ते आपसात म्हणू लागले, “योहानाने काही चिन्ह केले नाही, तरी येशूंबद्दल त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे ठरले आहे.”
४२
तेव्हा त्या ठिकाणी अनेक लोकांनी येशूंवर विश्वास ठेवला.

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • योहान १:२८

    हे सर्व यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे घडले, जिथे योहान बाप्तिस्मा देत होता.
    वचन ४० मधून
  • योहान ४:४१

    याकाळात त्यांच्या वचनामुळे आणखी पुष्कळ लोक विश्वासू झाले.
    वचन ४२ मधून
  • योहान २:२३

    वल्हांडणाच्या उत्सवात येशू यरुशलेमात असताना, अनेक लोकांनी त्यांच्याद्वारे घडत असलेली चिन्हे पाहिली व त्यांच्या नावावर विश्वास ठेवला.
    वचन ४२ मधून
  • योहान ४:३९

    “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली,” या तिच्या साक्षीवरून शोमरोन नगरातील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
    वचन ४२ मधून
  • योहान ७:३१

    तरी, लोकसमुदायामधील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले, “जेव्हा ख्रिस्त मसिहा येईल, तेव्हा तो या मनुष्यापेक्षा अधिक चिन्हे करेल काय?”
    वचन ४२ मधून
  • योहान ८:३०

    हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
    वचन ४२ मधून
  • योहान ११:४५

    यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला.
    वचन ४२ मधून
  • योहान १२:४२

    त्याच वेळेला पुष्कळांनी आणि पुढार्‍यांपैकी अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु परूश्यांमुळे ते आपला विश्वास व्यक्त करीत नव्हते. आपण सभागृहातून बहिष्कृत केले जाऊ असे त्यांना भय वाटत होते;
    वचन ४२ मधून
  • योहान १:२९

    दुसर्‍या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा!
    वचन ४१ मधून
  • योहान १:३०

    ते हेच आहेत, ज्यांच्या संदर्भात मी म्हणत होतो, ‘हा मनुष्य जो माझ्यानंतर येणार आहे, तो माझ्यापेक्षा थोर आहे कारण तो माझ्यापूर्वी होता.’
    वचन ४१ मधून
  • योहान १:३३

    मी स्वतः त्यांना ओळखत नव्हतो, परंतु ज्यांनी मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यासाठी पाठविले त्यांनी मला सांगितले होते की, ‘ज्या मनुष्यावर आत्मा उतरतांना आणि स्थिरावताना तुम्ही पाहाल, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’
    वचन ४१ मधून
  • योहान १:३४

    हे घडताना मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष देतो की हे परमेश्वराचे पुत्र आहेत.”
    वचन ४१ मधून
All John Sites (Jerusalem)
All John Sites (Jerusalem) View full PDF
Jesus' Third Journey from Galilee to Jerusalem
Jesus' Third Journey from Galilee to Jerusalem View full PDF
John 10:22-41
John 10:22-41 View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options