Skip to content
इय्योब ६:१-१३

इय्योब ६:१-१३

इय्योबाने उत्तर दिले:
“माझे क्लेश जर केवळ तोलून पाहिले आणि माझी सर्व विपत्ती तागडीत घातली तर!
ते खचितच वजनाने समुद्राच्या वाळूपेक्षा जास्त भरतील. म्हणूनच माझे शब्द उतावळेपणाचे आहेत ह्यात काही आश्चर्य नाही.
सर्वसमर्थाचे बाण माझ्यात शिरले आहेत, त्या बाणांचे विष माझा आत्मा पिऊन टाकतो; परमेश्वराचा आतंक माझ्याविरुद्ध उभा आहे.
गवत मिळते तेव्हा रानगाढव ओरडते काय, किंवा बैलापुढे चारा असतो तेव्हा तो हंबरतो काय?
बेचव पदार्थ मिठावाचून खाता येतो काय, किंवा अंड्याच्या पांढर्‍या बलकाला रुची असते काय?
त्याला मी स्पर्श करण्याचे नाकारतो; असे अन्न मला आजारी बनवते.
“अहा! जर मी मागितलेले मला मिळाले, ज्याची मी आशा करतो ते परमेश्वराने दिले,
की परमेश्वराने त्यांच्या इच्छेनुसार मला चिरडून टाकावे, आपला हात ढिला सोडून माझ्या जिवाचा नाश करावा!
१०
तरीही हे मला सांत्‍वनच असणार— आणि तीव्र क्लेशातही माझा आनंद असणार— कारण त्या परमपवित्रांची वचने मी धिक्कारली नाहीत.
११
“मी आशा धरावी अशी माझ्यात काय शक्ती आहे? माझ्यात असे काय आहे की मी धीर धरावा?
१२
माझ्याठायी खडकाचे सामर्थ्य आहे काय? किंवा माझे शरीर कास्याचे आहे काय?
१३
आता यश माझ्यापासून दूर केले गेले आहे, मग माझ्यात स्वतःला मदत करण्यासाठी शक्ती आहे का?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options