इय्योब १५:२०-३५
२०
दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर, तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो.
२१
त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात; सर्वकाही चांगले असताना विध्वंसक त्याच्यावर हल्ला करतो.
२२
अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही; तलवारीसाठी त्याला नेमले आहे.
२३
गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो; अंधकाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला माहीत आहे.
२४
संकट व चिंता त्याला घाबरे करतात; हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात,
२५
कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,
२६
त्यांच्या विरोधात अपमानाने जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो.
२७
“कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे; त्याच्या कंबरेवर मांस चढले आहे,
२८
पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल, कोणी राहत नाही अशा ठिकाणी, तुकडे पडलेल्या घरामध्ये त्याचा डेरा असेल.
२९
त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही, ना पृथ्वीवर त्याची मालमत्ता वाढणार.
३०
त्याला अंधकारातून सुटका नाही; अग्नीने त्याचा अंकुर जळून जाईल, परमेश्वराचा मुखश्वास त्याला दूर वाहून नेईल.
३१
निरर्थक धनावर विसंबून राहून त्याने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, कारण त्याला त्याचा काही लाभ मिळणार नाही.
३२
त्याच्या ठरलेल्या वेळे आधी तो गळून जाईल, आणि त्याच्या फांद्या भरभराट पावणार नाहीत.
३३
न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा, बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल.
३४
कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील, आणि लाच घेणार्यांचे डेरे अग्नी जाळून टाकील.
३५
ते क्लेशाची गर्भधारणा करतात आणि दुष्टतेला जन्म देतात; आणि त्यांचे गर्भाशय कपट प्रसवते.”
Settings