इय्योब १५:७-१६
७
“सर्व मानवजातीमध्ये तू प्रथम जन्मलेला आहेस का? पर्वत निर्माण होण्यापूर्वी तू अस्तित्वात आला का?
८
परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय? शहाणपणाचा ठेका तुझ्याकडे आहे का?
९
आम्हाला माहीत नाही, अशी तुला काय माहिती आहे? आम्हाला आहे, त्याहून अधिक कोणते ज्ञान तुला आहे?
१०
केस पांढरे झालेले आणि वयोवृद्ध पुरुष आमच्यामध्ये आहेत; जे तुझ्या वडिलांपेक्षाही अधिक वयाचे आहेत.
११
परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का?
१२
तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे, तुझे डोळे असे का चमकतात,
१३
यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे?
१४
“मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत, किंवा स्त्रीपासून जन्मलेले नीतिमान असावेत?
१५
जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही, त्यांच्या दृष्टीने जर प्रत्यक्ष स्वर्गदेखील शुद्ध नाही,
१६
तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो, तो किती कमी दर्जाचा असावा!
Settings