Skip to content
यहेज्केल १६:५३-६३

यहेज्केल १६:५३-६३

५३
“ ‘तथापि, सदोम व तिच्या मुलींची संपत्ती मी पुनर्स्थापित करेन आणि शोमरोन व तिच्या मुली व त्यांच्याबरोबर तुझीही संपत्ती पुनर्स्थापित करेन,
५४
यासाठी की त्यांचे सांत्वन करताना तू तुझा कलंक वाहून घेशील आणि तू केलेल्या कृत्यांची तुला लाज वाटेल.
५५
तुझ्या बहिणी सदोम व तिच्या मुली आणि शोमरोन व तिच्या मुली, त्यांच्या पूर्वस्थितीत परत जातील; आणि तू व तुझ्या मुली सुद्धा तुमच्या पूर्वस्थितीत परत जाल.
५६
तुझ्या गर्वाच्या दिवसात जेव्हा तुझी दुष्टता प्रगट झाली नव्हती, तेव्हा तू तर तुझी बहीण सदोमचे नाव देखील घेत नसे. त्याचप्रमाणे, आता, अरामाच्या कन्या व त्यांचे सर्व शेजारी आणि पलिष्ट्यांच्या कन्या यांनी तुझी अप्रतिष्ठा केली—तुझ्या सभोवती असलेल्या सर्वांनी तुला तुच्छ मानले.
५८
तुझ्या अश्लील व अमंगळ कृत्यांचे परिणाम तू भोगशील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
५९
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू ज्यास पात्र आहेस, तसा व्यवहार मी तुझ्याशी करेन, कारण करार मोडून तू माझी शपथ तुच्छ मानली आहेस.
६०
तरीही तुझ्या तारुण्याच्या दिवसांत मी तुझ्याशी केलेला करार मी स्मरण करेन आणि तुझ्याबरोबर सर्वकाळचा करार मी स्थापित करेन.
६१
आणि तुझ्यापेक्षा थोरल्या व धाकट्या बहिणींचे तू स्वागत करशील, तेव्हा तुला तुझे मार्ग आठवतील व तुला लाज वाटेल. तुझ्याबरोबरच्या माझ्या करारानुसार नसले तरी मी त्यांना तुझ्या मुलींप्रमाणे तुला देईन.
६२
तुझ्याशी मी आपला करार स्थापित करेन आणि मीच याहवेह आहे हे तू जाणशील.
६३
तुझ्यासाठी व जे सर्व तू केले त्यासाठी मी जेव्हा प्रायश्चित करेन, तेव्हा तुला आठवण होईल व लाज वाटेल आणि अवमानामुळे पुन्हा कधी आपले मुख उघडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options