- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
निवासमंडपाचे काम पूर्ण
निर्गम ३९:३२-४२
निवासमंडपाचे काम पूर्ण
३२
याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले.
३३
मग त्यांनी निवासमंडप मोशेकडे आणला: तंबू व त्याचे सर्व सामान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;
३४
मेंढ्याच्या लाल रंगवलेल्या कातड्यांचे आच्छादन आणि इतर प्रकारचे टिकाऊ चर्म, झाकण व त्याचा पडदा;
३५
कराराच्या नियमाचा कोश, त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण;
३६
मेज व त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;
३७
शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्याच्या दिव्यांची रांग व त्याची सर्व उपकरणे आणि प्रकाशासाठी जैतुनाचे तेल;
३८
सोन्याची धूपवेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप व तंबूच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;
३९
कास्याची वेदी व तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; गंगाळ व त्याची बैठक;
४०
अंगणाचे पडदे, खुंट्या व त्यांच्या बैठका आणि अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी पडदे; दोर्या व अंगणासाठी तंबूच्या मेखा; निवासमंडप व सभामंडपा साठी लागणारे सर्व साहित्य;
४१
पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.
४२
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती.
या उताऱ्यात
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
हे देखील पहा
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
निर्गम ३९:४२
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती.वचन ३२ मधूननिर्गम ३९:४३
मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.वचन ३२ मधूननिर्गम ३५:१०
“तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे:वचन ४२ मधूननिर्गम २५:४०
मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे बनवावे.”वचन ३२ मधूनफिलिप्पैकरांस २:१५
म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे” म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्यांप्रमाणे चमकाल.वचन ३७ मधूननिर्गम ३०:७
“रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा.वचन ३८ मधून1 इतिहास २८:१९
दावीद म्हणाला, “हा सगळा तपशील खुद्द याहवेहच्या सूचनांचा परिणाम आहे. आणि त्यांनीच मला या नकाशाचा सर्व तपशील समजण्याचे ज्ञान दिले.”वचन ३२ मधून1 शमुवेल १५:२२
परंतु शमुवेलने उत्तर दिले: “त्यांच्या आज्ञा पाळल्याने याहवेहला जितका होतो तितका आनंद होमार्पणे व यज्ञांनी होईल काय? यज्ञापेक्षा आज्ञापालन चांगले, आणि एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.वचन ३२ मधूनअनुवाद १२:३२
मी देत असलेल्या सर्व आज्ञांचे तुम्ही पालन करावे; त्यात काहीही भर घालू नये किंवा त्यातून काही कमी करू नये.वचन ३२ मधूननिर्गम २५:१
मग याहवेह मोशेला म्हणाले,वचन ३२ मधूननिर्गम २५:३१
“शुद्ध सोन्याचा एक दीपस्तंभ बनवा. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून कराव्या आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असावीत.वचन ३२ मधूननिर्गम ३५:१
मग मोशेने इस्राएली लोकांच्या संपूर्ण समुदायाला बोलाविले व त्यांना म्हटले, “ज्यागोष्टी तुम्ही कराव्या अशी याहवेहनी आज्ञा दिली आहे, त्या या आहेत:वचन ३२ मधून
हे कोठे घडते


अभ्यास टीप
Settings