निर्गम ३८:९-१८
९
मग त्यांनी अंगण तयार केले. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब होती व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे होते.
१०
आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका होत्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या.
११
उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब होती आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका होत्या व खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या.
१२
पश्चिमेकडील शेवटची बाजू पन्नास हात रुंदीची होती आणि त्याला पडदे लावलेले होते, त्याला दहा खांब व दहा बैठका असून खांबांना चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या.
१३
सूर्योदयाकडील पूर्वेकडील बाजू पन्नास हात रुंद होती.
१४
प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा होता. त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या,
१५
आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या दुसर्या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे होते, त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या.
१६
अंगणाच्या सर्व बाजूचे पडदे कातलेल्या रेशमी तागाचे होते.
१७
खांबांच्या बैठका कास्याच्या होत्या. खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्यांच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते; अशाप्रकारे अंगणाच्या प्रत्येक खांबाला चांदीच्या पट्ट्या होत्या.
१८
अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा होता व त्यावर भरतकाम केले होते. ते अंगणाच्या पडद्यासारखे वीस हात लांब होते आणि पाच हात उंच होते.
Settings