Skip to content
एस्तेर ९:१८-२८

एस्तेर ९:१८-२८

१८
परंतु शूशन शहरातील यहूदी तेराव्या व चौदाव्या दिवशी एकत्र आले व पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला.
१९
आणि म्हणूनच नगराच्या ग्रामीण भागातील यहूदी लोक अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी आनंद करून व एकमेकांना भेटी देऊन उत्सव साजरा करतात.
२०
मर्दखयाने या सर्व घटनांची नोंदणी केली आणि अहश्वेरोश राजाच्या दूर व जवळ असलेल्या सर्व प्रांतांतील यहूद्यांना पत्रे पाठविली.
२१
या पत्रांच्या द्वारे अदार महिन्याच्या चौदाव्या व पंधराव्या दिवशी वार्षिक आनंदोत्सव म्हणून जाहीर केला.
२२
कारण त्या दिवशी यहूदी लोकांचे त्यांच्या शत्रूपासून रक्षण झाले आणि त्यांच्या दुःखाचे हर्षात आणि त्यांच्या शोकाचे आनंदोत्सवात रूपांतर झाले. आणि हा दिवस मेजवान्या देऊन व एकमेकांना सर्व प्रकाराच्या भेटी देऊन व गोरगरिबांना दानधर्म करून आनंदाने साजरा करावा असे त्याने पत्राद्वारे त्यांना कळविले.
२३
तेव्हा यहूदी लोकांनी मर्दखयाने लिहिल्यानुसार सूचना स्वीकारली आणि हा उत्सव सुरू केला.
२४
कारण अगागी हम्मदाथाचा पुत्र हामान, यहूद्यांच्या शत्रूने सर्व यहूदी लोकांचा विध्वंस करून नाश करण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकून कट केला होता.
२५
या कटाचे प्रकरण राजापुढे आले, तेव्हा राजाने फर्मान काढले की यहूदी लोकांविरुद्ध रचलेला हामानाचा कट त्याच्याच डोक्यावर उलटविण्यात यावा आणि मग हामान व त्याचे पुत्र यांना फासावर लटकविण्यात यावे.
२६
(म्हणून या दिवसांना पूर वरून “पुरीम” हे नाव पडले.) जे घडले त्या सर्वांची या पत्रात नोंद करण्यात आली, कारण जे काही घडले व जे सर्व त्यांनी बघितले होते.
२७
राज्यातील सर्व यहूद्यांनी हा उत्सव सुरू करण्यास व आपल्या वंशजांनी आणि यहूदी होणार्‍या सर्वांनी न चुकता प्रत्येक वर्षी हे दोन दिवस योग्य वेळी साजरे करण्याचा संकल्प केला.
२८
आणि साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व शहरांमधील, प्रत्येक पिढीतील प्रत्येक कुटुंबात यहूदी लोक हे दोन दिवस वार्षिक उत्सवाचे प्रसंग म्हणून साजरे करतील. आणि हे पुरीम उत्सवाचे दोन दिवस साजरे करण्यास कधीही चुकू नये—यहूदी वंशातून या दिवसांची आठवण कधीही पुसली जाऊ नये.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options