Skip to content
दानीएल १:६-१९

दानीएल १:६-१९

जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह.
अश्पनज अधिकार्‍याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्‍याहला अबेदनगो.
पण दानीएलने राजाचे अन्न व द्राक्षारस घेऊन स्वतःला भ्रष्ट न करण्याचा निर्धार केला आणि त्याने मुख्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे स्वतःला भ्रष्ट न करण्याची विनंती केली.
आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्‍याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले,
१०
परंतु अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझे स्वामीराजाचे भय आहे, ज्यांनी मला तुमच्या खाण्या आणि पिण्याची देखरेख करण्यास नेमले आहे. तुमच्याबरोबरीच्या तरुणापेक्षा तुम्ही अशक्त का दिसावे? राजा तुमच्यामुळे माझे डोके उडवेल.”
११
दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्‍याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला,
१२
“कृपा करून आपल्या सेवकांना दहा दिवस पारखून पाहावे: आम्हाला काहीही देऊ नको, आम्हाला खाण्यास फक्त डाळ आणि पिण्यास पाणी द्या.
१३
मग आम्ही कसे दिसतो याची तुलना राजाच्या मेजवानीत भोजन करणार्‍या तरुणांशी करा आणि या तुमच्या सेवकांना तुमच्या दृष्टीस जे दिसेल त्याप्रमाणे वागवा.”
१४
तो हे करण्यास सहमत झाला आणि त्याने त्यांना दहा दिवस पारखून पाहिले.
१५
दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्‍या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले.
१६
म्हणून कारभाऱ्याने त्यांच्यासाठी नेमलेले भोजन आणि जे द्राक्षारस पीत होते ते काढून घेतले आणि त्याऐवजी डाळी देऊ लागला.
१७
परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.
१८
राजाने नेमून दिलेल्या वेळेनंतर प्रमुख अधिकार्‍याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरपुढे त्याच्या सेवेसाठी प्रस्तुत केले.
१९
राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options