Skip to content
प्रेषित २:३७-४१

प्रतिसाद, पश्चात्ताप व बाप्तिस्मा

प्रेषित २:३७-४१

प्रतिसाद, पश्चात्ताप व बाप्तिस्मा

३७
हे त्याचे बोलणे लोकांच्या अंतःकरणाला भेदले आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, “बंधुजनहो, आता आम्ही काय करावे?”
३८
पेत्राने उत्तर दिले, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
३९
हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.”
४०
आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.”
४१
ज्यांनी हा त्यांचा संदेश ग्रहण केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोकांची त्यांच्या संख्येत भर पडली.

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • प्रेषित २२:१६

    आणि आता विलंब कशासाठी? जा आणि बाप्तिस्मा घे आणि त्यांच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’
    वचन ३८ मधून
  • मार्क १६:१६

    जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील.
    वचन ३८ मधून
  • प्रेषित ८:१२

    परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला.
    वचन ३८ मधून
  • लूक २४:४७

    आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांमध्ये त्यांच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करण्यात यावी.
    वचन ३८ मधून
  • 1 पेत्र ३:२१

    ते पाणी आपल्यासाठी बाप्तिस्म्याचे चित्र आहे, ते शरीराची घाण काढून नाही तर परमेश्वराकडे सदसद्विवेकबुद्धीची प्रतिज्ञा केल्याने आता तुम्हालासुद्धा वाचविते. ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे वाचविते.
    वचन ३८ मधून
  • प्रेषित ३:१९

    यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी,
    वचन ३८ मधून
  • प्रेषित १०:४८

    मग त्याने आज्ञा केली की येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा करावा. मग पेत्राने त्यांच्याबरोबर काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.
    वचन ३८ मधून
  • रोमकरांस ६:३

    ज्या आपण सर्वांनी ख्रिस्त येशूंमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्यांच्या मृत्यूमध्येही बाप्तिस्मा घेतला हे तुम्हाला माहीत नाही का?
    वचन ३८ मधून
  • प्रेषित १०:४४

    पेत्र हे वचन बोलत असतानाच, सर्व संदेश ऐकणार्‍यांवर पवित्र आत्मा उतरला.
    वचन ३८ मधून
  • प्रेषित १०:४५

    पेत्राबरोबर आलेले विश्वासणारे, ज्यांची सुंता झाली होती ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी पाहिले की गैरयहूदी लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतून दिला आहे.
    वचन ३८ मधून
  • प्रेषित ८:१५

    ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील नवीन विश्वासणार्‍यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली,
    वचन ३८ मधून
  • प्रेषित ८:१७

    मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला.
    वचन ३८ मधून
All Acts Sites (Eastern Mediterranean)
All Acts Sites (Eastern Mediterranean) View full PDF
The Gathering at Pentecost
The Gathering at Pentecost View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options