- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
परकीय वसाहतकरी व संमिश्र उपासना
2 राजे १७:२४-४१
२४
मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले.
२५
जेव्हा ते तिथे राहू लागले, प्रारंभी त्यांनी याहवेहची उपासना केली नाही; म्हणून त्यांनी सिंहांना त्यांच्यामध्ये पाठवून त्यांच्यापैकी काही जणांना ठार केले.
२६
अश्शूरच्या राजाकडे याचा निरोप सांगण्यात आला: “ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या देशातून हाकलून दिले आणि शोमरोनच्या नगरांत स्थायिक केले त्यांना त्या देशाच्या देवाला काय हवे हे माहीत नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये सिंहांना पाठविले जे त्यांना ठार मारीत आहेत, कारण देवाला काय हवे हे त्या लोकांना माहीत नाही.”
२७
तेव्हा अश्शूरच्या राजाने हे फर्मान काढले: “शोमरोनामधून बंदिवान करून आणलेल्या याजकांपैकी एका याजकाला तिथे पाठवा, जेणेकरून तो तिथे राहील आणि लोकांना त्या देशातील देवाला काय हवे ते शिकविल.”
२८
म्हणून शोमरोनातून बंदिवासात पाठविलेला एक याजक बेथेल येथे राहायला आला आणि त्याने त्यांना याहवेहची उपासना कशी करावी हे शिकविले.
२९
तरीसुद्धा, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपले दैवत बनविले, आणि शोमरोनी लोकांनी बांधलेल्या उच्चस्थानी त्यांची स्थापना केली, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपल्या नगरात असेच केले.
३०
बाबेलमधील लोकांनी सुक्कोथ-बनोथ मूर्ती केली. कूथमधील लोकांनी नेरगल केला व हमाथातील लोकांनी अशीमा केली;
३१
अव्वी लोकांनी निभज व तर्ताक केले आणि सफरवी लोकांनी तर अद्राम्मेलेक व अनम्मेलेक या आपल्या दैवतांच्या वेद्यांवर आपल्या मुलामुलींचे अग्नीत बळी दिले.
३२
त्यांनी याहवेहची उपासना केली, परंतु त्यांनी त्यांच्या लोकांची उच्च स्थानावरील मंदिरांमध्ये याजक म्हणून नियुक्त केले.
३३
ते याहवेहची उपासना करीत असले, तरी ज्या देशातून ते आले होते, त्या देशाच्या चालीरीतींप्रमाणे ते आपल्या स्वतःच्या दैवतांची उपासना करीत असत.
३४
ते आजवर याहवेहची उपासना करीत नाही किंवा याहवेहने ज्यांचे नाव इस्राएल असे ठेवले त्या याकोबाच्या वंशजांना जे विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा दिल्या त्याचे ते पालन करत नाहीत.
३५
जेव्हा याहवेहने इस्राएली लोकांसोबत करार केला, तेव्हा त्यांनी त्यांना आज्ञा केली: “इतर दैवतांची उपासना करू नका किंवा त्यांना नमन करू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांना यज्ञार्पणे करू नका.
३६
परंतु ज्या याहवेहने आपल्या अलौकिक सामर्थ्याने आणि वाढविलेल्या भुजांनी इजिप्तमधून त्यांना बाहेर आणले होते केवळ त्याच याहवेहची तुम्ही उपासना करावी. त्यांनाच तुम्ही नमन करावे आणि त्यांनाच यज्ञार्पणे अर्पण करावी.
३७
त्यांनी लिहून दिलेल्या विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा यांचे तुम्ही खात्रीने नेहमी काळजीपूर्वक पालन करावे. इतर दैवतांची उपासना करू नका.
३८
मी तुमच्याशी केलेला करार विसरू नका आणि इतर दैवतांची उपासना करू नका.
३९
तुम्ही फक्त याहवेह तुमच्या परमेश्वराचीच उपासना करावी; तेव्हा ते तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवितील.”
४०
त्यांनी याहवेहचे ऐकले नाही, परंतु त्यांच्या आधीच्या रीतींना ते चिकटून राहिले.
४१
हे लोक याहवेहची उपासना करीत असतानाही ते त्यांच्या मूर्तीची सेवा करीत होते. आजवर त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्या पूर्वजांनी केले तसेच करीत आहेत.
Settings