Skip to content
2 करिंथकरांस ७:२-४

पौलाची सचोटी व प्रेम

2 करिंथकरांस ७:२-४

पौलाची सचोटी व प्रेम

तुमच्या हृदयात आमच्यासाठी जागा करा. आम्ही कोणाविरुद्ध अन्याय केला नाही. आम्ही कोणालाही मार्गभ्रष्ट केले नाही किंवा कोणाचा गैरफायदा घेतला नाही.
तुम्हाला दंडाज्ञा व्हावी म्हणून मी हे सांगत नाही, कारण मी पूर्वीच सांगितले आहे की तुम्हाला आमच्या हृदयात स्थान आहे आणि आम्ही जगू किंवा मरू तेव्हा तुमच्याबरोबर असू.
मी अगदी मोकळेपणाने तुमच्याबरोबर बोलतो; मला तुमचा अतिशय अभिमान आहे. मी खूप उत्तेजित झालो आहे; आमच्या या सर्व दुःखात माझ्या आनंदाला कोणतीच सीमा उरली नाही.

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • 2 करिंथकरांस १:४

    ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे.
    वचन ४ मधून
  • 2 करिंथकरांस ६:१२

    आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे.
    वचन २ मधून
  • 2 करिंथकरांस ६:११

    करिंथकरांनो आम्ही तुमच्यापासून काहीच न लपविता आमचे हृदय तुमच्यासमोर मोकळे केले आहे.
    वचन ३ मधून
  • 2 करिंथकरांस ३:१२

    आम्हाला अशी आशा आहे म्हणून आम्हाला मोठे धैर्यही आहे.
    वचन ४ मधून
  • 2 करिंथकरांस ६:१३

    तुम्ही माझी स्वतःची मुले आहात असे समजून मी बोलत आहे. तुमची अंतःकरणेसुद्धा संपूर्णपणे उघडी करा.
    वचन २ मधून
  • 2 करिंथकरांस ११:९

    आणि मी जेव्हा तुमच्याजवळ होतो आणि मला गरज पडली, मी कोणालाही ओझे झालो नाही, कारण मासेदोनियातून जे बंधू आले त्यांनी माझ्या गरजांची परिपूर्ती केली व माझे ओझे कोणत्याही प्रकारे तुम्हावर पडणार नाही आणि मी असेच पुढेही करेन.
    वचन २ मधून
  • प्रेषित २०:३३

    मी कोणाच्याही सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही.
    वचन २ मधून
  • 1 शमुवेल १२:३

    मी येथे तुमच्यापुढे उभा आहे. याहवेहच्या आणि त्याच्या अभिषिक्ताच्या उपस्थितीत माझ्याविरुद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला आहे? मी कोणाचा गाढव घेतला आहे? मी कोणाला फसविले आहे? मी कोणावर अत्याचार केला आहे? न्याय विपरीत करण्यासाठी मी कोणाच्या हातून लाच घेतली आहे? यापैकी कोणतीही गोष्ट जर मी केली असेल तर त्याची मी भरपाई करेन.”
    वचन २ मधून
  • 1 शमुवेल १२:४

    त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही आम्हाला कधीही फसविले नाही किंवा आमच्यावर अत्याचार केला नाही, कोणाच्याही हातून तुम्ही काहीही घेतलेले नाही.”
    वचन २ मधून
  • 2 करिंथकरांस १२:१४

    आता मी तिसर्‍यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे.
    वचन २ मधून
  • 2 करिंथकरांस १२:१८

    तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?
    वचन २ मधून
  • 2 योहान १:१०

    जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका.
    वचन २ मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options