Skip to content
2 इतिहास २९:३-१९

2 इतिहास २९:३-१९

त्याच्या राज्यकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली.
त्याने याजकांना आणि लेवींना आणले आणि त्यांना पूर्व बाजूला असलेल्या चौकात एकत्र जमविले.
आणि म्हणाला: “लेवींनो, माझे ऐका! आता तुम्ही स्वतःला पवित्र करा आणि याहवेह तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर यांचे मंदिर पवित्र करा. सर्व अशुद्धता या पवित्रस्थानातून काढून टाका.
आमचे पालक अविश्वासू होते; त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि त्यांचा त्याग केला. त्यांनी याहवेहच्या निवासस्थानापासून त्यांचे मुख फिरविले आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली.
त्यांनी अंगणाचे दरवाजे बंद केले आणि दिवे विझविले. त्यांनी धूप जाळला नाही किंवा त्या पवित्रस्थानात इस्राएलच्या परमेश्वराला कोणतेही होमार्पण दिले नाही.
त्यामुळेच याहवेहचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला आहे; त्यांनी त्यांना भयप्रद व दहशत निर्माण करणारे आणि तिरस्काराचा विषय असे केले आहे, जसे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता.
याकारणामुळेच आपले पूर्वज तलवारीने मारले गेले आणि आपले पुत्र आणि कन्या आणि आपल्या स्त्रिया बंदिवासात ठेवलेल्या आहेत.
१०
आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल.
११
माझ्या मुलांनो, आता निष्काळजी राहू नका, कारण याहवेहनी तुम्हाला त्यांच्यासमोर उभे राहण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे सेवक होण्यासाठी आणि धूप जाळण्यासाठी निवडले आहे.”
१२
तेव्हा या लेवीय लोकांनी कामास सुरुवात केली: कोहाथी वंशातील: अमासय याचा पुत्र महथ आणि अजऱ्याह याचा पुत्र योएल; मरारी वंशातील: अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजर्‍याह; गेर्षोनी वंशातील: जिम्माहचा पुत्र योवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन;
१३
एलीजाफानच्या वंशातील: शिम्री आणि ईयेल; आसाफाच्या वंशातील: जखर्‍याह आणि मत्तन्याह;
१४
हेमानच्या वंशातील: यहीएल आणि शिमी; यदूथूनच्या वंशातील: शमायाह आणि उज्जीएल.
१५
जेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या लेवींना एकत्र जमविले आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले, तेव्हा ते याहवेहच्या वचनाचे पालन करून, राजाज्ञेनुसार याहवेहच्या मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी मंदिरात गेले.
१६
याजक याहवेहच्या पवित्रस्थानात त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आत गेले. त्यांना याहवेहच्या मंदिरात जे काही अशुद्ध सापडले ते सर्व त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या अंगणात आणले. लेव्यांनी ते घेतले आणि किद्रोन खोऱ्याकडे नेऊन फेकले.
१७
पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी शुद्धीकरण सुरू केले आणि पहिल्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते याहवेहच्या मंदिराजवळ पोहोचले. आणखी आठ दिवस त्यांनी पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी काम पूर्ण करून याहवेहचे मंदिर पवित्र केले.
१८
मग ते हिज्कीयाह राजाकडे गेले आणि त्यांनी अहवाल दिला: “आम्ही याहवेहचे संपूर्ण मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यातील सर्व भांडी आणि पवित्र भाकर ठेवण्यासाठी असलेला मेज, त्याच्या सर्व वस्तू शुद्ध केल्या आहेत.
१९
राजा आहाज राजा असताना त्यांच्या अविश्वासूपणामध्ये त्यांनी काढून टाकलेल्या सर्व वस्तू आम्ही तयार केल्या आहेत आणि पवित्र केल्या आहेत. त्या सर्व वस्तू आता याहवेहच्या वेदीसमोर आहेत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options