1 थेस्सलनीकाकरांस ५:१-११
१
आता, बंधू आणि भगिनींनो, वेळ आणि घटका याविषयी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही,
२
कारण तुम्हाला हे पक्के ठाऊक आहे की जसा चोर रात्री येतो तसा प्रभूचा दिवस येईल.
३
“शांतता आणि सुरक्षितता,” असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.
४
परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही अंधारात असू नये जेणे करून हा दिवस तुम्हाला अचानक येणाऱ्या चोरासारखा चकित करेल.
५
परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सर्व प्रकाशाची व दिवसाची मुले आहात. आम्ही रात्रीचे किंवा अंधकाराचे नाही.
६
आपण झोपी गेलेल्या सारखे असू नये, परंतु जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे.
७
झोप घेणारे, रात्री झोपतात, मद्य पिणारे, रात्री मद्य पितात.
८
परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतीचे चिलखत धारण करावे आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे.
९
क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे.
१०
ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे.
११
म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची वुद्धी करण्यासाठी झटा.
Settings