मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल ९:१८-२४

शौल शमुवेलाला भेटतो

1 शमुवेल ९:१८-२४
१८
शौलाने नगराच्या प्रवेशद्वारातच शमुवेलकडे जाऊन विचारले, “संदेष्ट्याचे घर कुठे आहे हे मला कृपा करून सांगाल काय?”
१९
“मीच पाहाणारा आहे,” शमुवेलने शौलास उत्तर दिले. “माझ्यापुढे वर उंचस्थानी जा, कारण आज तुला माझ्याबरोबर भोजन करावयाचे आहे आणि सकाळी मी तुला तुझ्या मार्गाने पाठवून देईन आणि जे तुझ्या अंतःकरणात आहे ते मी तुला सांगेन.
२०
आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती, त्यांची काळजी करू नकोस; ती सापडली आहेत. इस्राएलची सर्व इच्छा कोणाकडे वळली आहे, तुझ्याकडे व तुझ्या संपूर्ण कुटुंबाकडे ती वळली नाही काय?”
२१
शौलाने उत्तर दिले, “परंतु मी बिन्यामीन गोत्र जे इस्राएलचे सर्वात लहान, त्यातील नाही काय आणि माझे कूळ बिन्यामीनच्या गोत्रातील सर्वात लहान कूळ नाही काय? तर मग तुम्ही मला असे का बोलत आहात?”
२२
नंतर शमुवेलने शौल आणि त्याच्या सेवकास भोजनगृहात आणले आणि जिथे आमंत्रित केलेले सुमारे तीस लोक होते तिथे प्रमुखस्थानी त्यांना बसविले.
२३
शमुवेल आचार्‍याला म्हणाला, “मांसाचा जो तुकडा तुला देऊन मी बाजूला ठेवायला सांगितला होता, तो घेऊन ये.”
२४
तेव्हा आचार्‍याने मांडीचा भाग आणि त्याच्याबरोबर जे होते ते उचलून शौलासमोर मांडले. शमुवेल म्हणाला, “हे तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे. हे खा, कारण मी जेव्हा म्हणालो, ‘मी पाहुण्यांना आमंत्रित केले आहे,’ तेव्हापासून हे तुझ्यासाठी या प्रसंगासाठी बाजूला राखून ठेवण्यात आले होते.” त्या दिवशी शौलाने शमुवेलबरोबर भोजन केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options