Skip to content
1 शमुवेल ९:१५-१७

परमेश्वर शमुवेलाला शौल येणार असल्याचे प्रकट करतो

1 शमुवेल ९:१५-१७
१५
शौल येण्याच्या एक दिवस आधी याहवेहने शमुवेलला हे प्रकट केले होते:
१६
“याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएली लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”
१७
जेव्हा शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला, याहवेह त्याला म्हणाले, “हाच मनुष्य आहे, ज्याच्या विषयी मी तुला सांगितले होते; तो माझ्या लोकांवर शासन करेल.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options