1 इतिहास ८:६-२७
६
एहूदाचे पुत्र, जे गेबा येथील कुटुंबाचे प्रमुख होते, ज्यांचा पाडाव करून त्यांना मानाहथ येथे नेले ते:
७
नामान, अहीयाह व गेरा यास कैद करून पाठविण्यात आले. गेराचे पुत्र उज्जा व अहीहूद.
८
शहरयिमाने आपल्या पत्नी हुशीम व बारा यांच्यापासून घटस्फोट घेतला व मोआब देशामध्ये त्याला पुत्र झाले.
९
त्याची पत्नी होदेशच्या पोटी झालेले पुत्र: योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
१०
यऊस, शख्याह व मिर्माह. हे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख होते.
११
हुशीमेपासून त्यास झालेले पुत्र अबीतूब व एल्पाल.
१२
एल्पालाचे पुत्र: एबर, मिशाम व शमेद (ज्याने ओनो व लोद ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे वसविली),
१३
बरीयाह व शमा हे अय्यालोन लोकांचे कुटुंबप्रमुख होते व त्यांनी गथकरास पळवून लावले.
१४
अहियो, शशक, यरेमोथ,
१५
जबद्याह, अराद, एदर,
१६
मिखाएल, इश्पाह व योहा हे बरीयाहचे पुत्र.
१७
जबद्याह, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
१८
इश्मरय, इज्लीयाह व योबाब हे एल्पालाचे पुत्र.
१९
याकीम, जिक्री, जब्दी,
२०
अलीएनय, सिलथाई, एलीएल,
२१
अदायाह, बरीयाह व शिम्राथ हे शिमीचे पुत्र.
२२
इश्पान, एबर, एलीएल,
२३
अब्दोन, जिक्री, हानान,
२४
हनन्याह, एलाम, अनथोथीयाह,
२५
इफदयाह व पेनुएल हे शशकाचे पुत्र.
२६
शमशेराय, शहर्याह, अथल्याह,
२७
यारेश्याह, एलीयाह व जिक्री हे यरोहामाचे पुत्र.
Settings