Zeruiah बद्दल बायबलमधील वचने: Mother of three of David's great soldiers
Mother of three of David's great soldiers बद्दल वचने
जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता.
आणि आज, मी अभिषिक्त राजा असूनही, निर्बल आहे आणि जेरुइयाहचे हे पुत्र माझ्यासाठी फारच शक्तिमान आहेत. याहवेह वाईट कृत्य करणाऱ्यास त्याच्या दुष्कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देवो!”
तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.”
परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?”
तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे.
अबशालोमने योआबाच्या जागी अमासाची सेनापती म्हणून नेमणूक केली. अमासा हा इथ्रा इश्माएली याचा पुत्र असून, नाहाशाची कन्या, जेरुइयाहची बहीण योआबाची आई अबीगईलशी त्याचा विवाह झाला होता.
त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल. जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते.