Skip to content

Words बद्दल बायबलमधील वचने

22 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?

  2. याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.

  3. त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात, पण त्याच्या अंतःकरणात युद्ध सुरू आहे; त्याचे शब्द तेलापेक्षाही मऊ होते, पण उगारलेल्या तलवारींसारखे होते.

  4. तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस, तुझ्या मुखातील वचनाने तू स्वतःला पाशात गुंतवून घेतले आहेस.

  5. शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो; पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.

  6. समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो— योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे!

  7. अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.

  8. योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे.

  9. बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय? मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे.

  10. अनेक चिंता असल्यास स्वप्न पडते, आणि जास्त बडबड करण्याने मूर्ख ओळखला जातो.

  11. सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात, पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात.

  12. त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते; आणि त्यांच्या बोलण्याचा शेवट दुष्टाईच्या वेडेपणाने होतो;

  13. मूर्ख शब्द वाढवून बोलतात. पुढे काय घडणार ते कोणी जाणत नाही; त्यांच्यानंतर काय होणार असे एखाद्याला कोणी व्यक्ती सांगू शकणार काय?

  14. सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे, त्यावर थकलेल्या लोकांना पडू न देणारी वचने आहेत, ते मला रोज सकाळी जागे करतात, शिक्षण प्राप्त करणाऱ्यासाठी उघडावे, तसे ते माझे कान उघडतात.

  15. मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे.

  16. कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल.”

  17. कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची करतात. आपल्या गोड व लाघवी भाषणाने, ते भोळ्यांच्या अंतःकरणास भुरळ पाडतात.

  18. तुमच्याबाबतीत असेच आहे. त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेत बोलल्याशिवाय, तुम्ही काय म्हणता हे इतरांना कसे समजेल? तुम्ही फक्त वार्‍याबरोबर बोलत आहात असे होईल.

  19. परंतु मंडळीत अन्य भाषेतून दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, इतरांना बोध होईल असे पाच शब्द बोलणे मी अधिक पसंत करेन.

  20. स्वर्गामध्ये घेतला गेला, आणि ज्या गोष्टींचे वर्णन करून सांगता येणार नाही अशा गोष्टी ऐकल्या. त्या गोष्टी दुसर्‍यांना सांगण्याची परवानगी नाही.

  21. परमेश्वराच्या लोकांना या गोष्टींची आठवण करून देत राहा. परमेश्वरासमोर त्यांना इशारा दे की त्यांनी शाब्दिक वाद करू नये. याचा कोणालाही फायदा होत नाही, परंतु यामुळे ऐकणार्‍यांचा नाश होतो.

  22. आपण सर्वजण अनेक प्रकारे अडखळतो. जर कोणी बोलण्यात कधीही चुकत नाही, तर तो परिपूर्ण आहे व आपले सर्व शरीर ताब्यात ठेवण्यास समर्थ आहे.