Skip to content

Wheel बद्दल बायबलमधील वचने

23 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो; तो मळणीचे चक्र त्यांच्यावर फिरवितो.

  2. आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्‍यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,

  3. म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला.

  4. जेव्हा मी त्या जिवंत प्राण्यांकडे पाहात होतो, तेव्हा मला दिसले प्रत्येक प्राण्याजवळ त्यांच्या चार मुखांच्या बाजूला भूमीवर एकएक चाक होते.

  5. त्या चाकांचे रूप व घडण अशाप्रकारे होते: ते पुष्कराजसारखे चमकत होते आणि चारही चाके सारखीच दिसत होती. ते असे दिसत होते की जसे एका चाकात दुसरे चाक आहे.

  6. ते चालत असताना, ज्या दिशेकडे त्यांच्यापैकी एकाचे मुख आहे त्या कोणत्याही एका दिशेने चालत असत; आणि ते प्राणी जात असता चाकांनी आपली दिशा बदलली नाही.

  7. त्यांच्या काठा उंच व भयावह होत्या आणि चारही कडांना सर्वत्र डोळे होते.

  8. ते जिवंत प्राणी जसे पुढे जात, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात असत; आणि जेव्हा जिवंत प्राणी भूमीवरून उठत, चाकेही उठत असत.

  9. जिथे कुठे आत्मा जाईल, तिथे ते जाई, आणि त्यांच्याबरोबर चाकेसुद्धा उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.

  10. जेव्हा प्राणी पुढे जात, तेव्हा ते देखील पुढे जात; जेव्हा प्राणी स्थिर उभे राहत, ते देखील स्थिर उभे राहत असत; आणि जेव्हा प्राणी भूमीवरून उठत, चाकेसुद्धा त्यांच्याबरोबर उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.

  11. हा त्या जिवंत प्राण्यांच्या पंखांचा आवाज होता, जे एकमेकांच्या पंखांना घासत होते आणि त्याच्या बाजूंना असलेल्या चाकांचा मोठ्या गर्जनेचा आवाज होता.

  12. मी पाहिले, करुबांच्या बाजूला चार चाके, प्रत्येक करुबाच्या बाजूला एक चाक; आणि ती चाके पुष्कराजसारखी चकाकत होती.

  13. ती चारही चाके सारखीच दिसत होती; प्रत्येक चाक जसे दुसर्‍या चाकातून छेदून जात होती.

  14. जेव्हा करूब पुढे जात असे, तेव्हा त्यांची तोंडे ज्या दिशेने होती त्या चार दिशांपैकी एका दिशेने चाके जात; करूब जात असताना चाके इकडे तिकडे वळत नसत. आणि ते ज्या दिशेने त्यांचे तोंड आहे त्याच दिशेने, कुठेही न वळता जात असत.

  15. त्यांची पाठ, त्यांचे हात आणि त्यांचे पंख यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शरीरावर डोळे होते, त्यांच्या चाकांवर सुद्धा डोळे होते.

  16. “गरगर फिरणारी चाके” असे त्या चाकांना म्हटले गेलेले मी ऐकले.

  17. प्रत्येक करुबाला चार तोंडे होती: एक करुबाचे होते, दुसरे मनुष्याच्या तोंडासारखे, तिसरे सिंहासारखे व चौथे गरुडासारखे होते.

  18. नंतर करूब वर उठले. हे तर तेच जिवंत प्राणी होते जे मी खेबर नदीकाठी पाहिले होते.

  19. जेव्हा करूब पुढे निघाले, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात; आणि जमिनीवरून उठण्यासाठी जेव्हा करूब आपले पंख पसरवित असे, चाके आपली बाजू सोडत नसत.

  20. करूब जेव्हा स्थिर उभे राहात, ते सुद्धा स्थिर उभे राहात असत; आणि जेव्हा करूब उठत असे, ते त्यांच्याबरोबर उठत, कारण जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.

  21. मग याहवेहचे वैभव मंदिराच्या उंबरठ्यावरून निघाले आणि करुबांवर जाऊन थांबले.

  22. मी पाहत असता, करुबांनी आपली पंखे पसरली आणि जमिनीवरून उठले, ते पुढे जात असता, चाकेही त्यांच्याबरोबर गेली. ते याहवेहच्या भवनाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे थांबले, आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.

  23. नंतर करुबांनी, त्यांच्या बाजूला असलेल्या चाकांबरोबर आपले पंख पसरले आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.