Skip to content

Wages बद्दल बायबलमधील वचने

54 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.

  2. गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.

  3. त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्‍हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  4. बैल धान्याची मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको.

  5. “धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो, अन्यायाने माळे बांधतो, त्याच्या स्वतःच्या लोकांना बिनपगारी कामासाठी लावतो, आणि त्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना देत नाही.

  6. तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण कापणी मात्र फारच थोडीच केली. तुम्ही जेवता, पण ते कधीही पुरेसे नसते. तुम्ही पीता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही वस्त्र घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. तुम्ही वेतन मिळविता, पण तुम्ही ते पुष्कळ भोके असलेल्या खिशांमध्ये ठेवता.”

  7. “त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  8. तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी अन्नास पात्र आहे.

  9. “स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.

  10. एक दिवसासाठी एक दिनार देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले.

  11. “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले.

  12. त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’

  13. म्हणून ते गेले. “तो पुन्हा दुपारच्या सुमारास बाहेर गेला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासही त्याने असेच केले.

  14. पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’

  15. “ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले. “तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’

  16. “संध्याकाळी धन्याने आपल्या मुकादमाला सांगितले, ‘द्राक्षमळ्यामध्ये आलेल्या मजुरांना बोलवा आणि जे शेवटी आले होते त्यांच्यापासून आरंभ करून जे प्रथम आले होते त्या सर्वांना मजुरी द्या.’

  17. “तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली.

  18. त्यावरून आधी आलेल्या मजुरांना, आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले; परंतु त्यांनाही एका दिवसाचीच मजुरी मिळाली.

  19. जेव्हा त्यांना ती मिळाली, तेव्हा त्यांनी धन्याविरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात केली.

  20. ‘त्या माणसांनी फक्त एकच तास काम केले, तरी त्यांना तुम्ही दिवसभराची मजुरी दिली आणि आम्ही येथे सकाळपासून उन्हात दिवसभर राबलो, तरी आम्हाला तुम्ही त्यांच्यासारखेच केले.’

  21. “त्याने त्यांच्यापैकी एकाला म्हटले, ‘मित्रा, तुझ्यावर मी कोणताही अन्याय केलेला नाही; याच मजुरीत दिवसभर काम करण्याचे तू कबूल केले होतेस की नाही?

  22. मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते.

  23. माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’

  24. काही शिपायांनी विचारले, “आम्ही काय करावे?” योहानाने उत्तर दिले. “धमक्या देऊन किंवा खोटे आरोप रचून पैसा उकळू नका आणि आपल्या वेतनात संतुष्ट राहा.”

  25. घरोघरी न जाता तिथेच राहा आणि तुम्हाला जे देण्यात येईल, ते खा व प्या. कारण कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे.