मुख्य मजकुरावर जा

Uncleanness बद्दल बायबलमधील वचने

38 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे.

  2. मृत पावलेले किंवा जंगली प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस त्याने खाऊन अशुद्ध होऊ नये. मी याहवेह आहे.

  3. इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे.

  4. मग ते स्त्री असो किंवा पुरुष; त्यांना बाहेर पाठवावे. ज्या छावणीत मी तुमच्यामध्ये राहतो, ती त्यांच्यामुळे भ्रष्ट होऊ नये, म्हणून त्यांना बाहेर पाठवावे.

  5. परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.

  6. आणि मोशेला म्हणाले, “आम्ही मृत देहामुळे अशुद्ध झालो आहोत, परंतु इस्राएली लोकांबरोबर नेमलेल्या वेळी याहवेहला अर्पण सादर करण्यापासून आम्हाला का वंचित ठेवावे?”

  7. मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.”

  8. मग याहवेहने मोशेला म्हटले,

  9. “इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,

  10. परंतु त्यांनी तो दुसर्‍या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे.

  11. “जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.

  12. एखादा पुरुष स्वप्नावस्थेमुळे रात्रीतून अशुद्ध झाला असेल, तर त्याने छावणीबाहेर जावे आणि बाहेरच राहावे.

  13. पण जशी संध्याकाळ होईल तसे त्याने स्नान करावे व सूर्यास्तानंतर छावणीत परत यावे.