Skip to content

Uncleanness बद्दल बायबलमधील वचने: General references

38 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एखादी व्यक्ती अजाणतेने विधिनियमानुसार अशुद्ध ठरविलेल्या वस्तूला म्हणजेच खाण्यास निषिद्ध असलेल्या ग्रामपशूच्या किंवा वनपशूच्या मृत शरीराला, किंवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या मृत शरीराला स्पर्श करेल, तर ती व्यक्ती अशुद्ध झाली. निषिद्ध असलेल्या मृत शरीराचा स्पर्श झाला, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले, तर ती व्यक्ती दोषी आहे.

  2. कोणत्याही प्रकारच्या मानवी अशुद्धतेस कोणतीही व्यक्ती अजाणतेने स्पर्श करेल आणि ते अशुद्ध झाले आहेत हे त्यांना समजणार नाही, परंतु नंतर त्यांना त्यांचा दोष समजून आल्यास;

  3. परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे.

  4. जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्‍या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”

  5. “ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल.

  6. याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये,

  7. आपले जवळचे नातलग म्हणजे त्याची आई किंवा वडील, पुत्र किंवा कन्या, त्याचा भाऊ

  8. किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो.

  9. याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये.

  10. “ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत.

  11. त्यांनी त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र राहावे आणि त्यांच्या परमेश्वराच्या नावाला काळिमा लावू नये. ते याहवेहला अन्नार्पण म्हणजे त्यांच्या परमेश्वराचे अन्न अर्पितात, म्हणून त्यांनी पवित्र राहावे.

  12. “ ‘त्यांनी वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या किंवा त्यांच्या पतीला घटस्फोट दिलेल्या स्त्रियांबरोबर विवाह करू नये; कारण याजक त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र आहेत.

  13. त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो.

  14. “ ‘एखाद्या याजकाची कन्या वेश्याकर्म करून स्वतःला भ्रष्ट करते तर ती आपल्या पित्याला अशुद्ध करते, म्हणून तिला अग्नीत जाळून टाकावे.

  15. “ ‘प्रमुख याजक, म्हणजे ज्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतण्यात आले आहे व जो याजकीय वस्त्रे घालण्यास पवित्र करण्यात आला आहे, त्याने शोक व्यक्त करण्याकरिता आपले केस मोकळे सोडू नयेत किंवा आपली वस्त्रे फाडू नये.

  16. ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये.

  17. त्याच्या परमेश्वराचे पवित्रस्थान सोडू नये किंवा ते अपवित्र करू नये, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाद्वारे समर्पित करण्यात आलेला आहे. मी याहवेह आहे.

  18. “ ‘त्याने कुमारिकेबरोबरच विवाह करावा.

  19. त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा,

  20. त्यामुळे तो त्याच्या लोकांमध्ये त्याचे वंशज अशुद्ध करणार नाही. मी याहवेह आहे, जो त्याला पवित्र करतो.’ ”

  21. “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग की, इस्राएलच्या लोकांनी आणलेल्या पवित्र अर्पणांचा आदर करावा, म्हणजे ते माझ्या पवित्र नावाला अपवित्र करणार नाही. मी याहवेह आहे.

  22. “त्यांना सांग: ‘आतापासून पुढे पिढ्यान् पिढ्या जो कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी याहवेहसाठी आणलेल्या पवित्र अर्पणांना स्पर्श करेल, त्याचा माझ्या समक्षतेपासून उच्छेद करावा; मी याहवेह आहे.

  23. “ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,

  24. किंवा जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल.

  25. अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये.