Skip to content

Transfiguration बद्दल बायबलमधील वचने

36 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग दोन पुरुष म्हणजे स्वतः मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले.

  2. आणि ते त्यांच्याबरोबर परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे नियोजित केलेल्या व यरुशलेममध्ये येशूंना होणार्‍या प्रयाणासंबंधाने बोलत होते.

  3. यावेळी पेत्र आणि इतर दोन शिष्यांना अतिशय झोप आली होती, परंतु जागे झाल्यानंतर त्यांनी येशूंचे वैभव पाहिले आणि दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे असलेले पाहिले.

  4. मग मोशे व एलीयाह येशूंना सोडून जात असताना, पेत्र येशूंना म्हणाले, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण येथे तीन मंडप—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी बांधू या.” त्याला काय बोलावे हे समजत नव्हते.

  5. पण तो हे बोलत असतानाच, मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि त्यात प्रवेश करते वेळी ते भयभीत झाले.

  6. मेघातून एक वाणी म्हणाली, “हा माझा पुत्र आहे, मी याला निवडले आहे, याचे तुम्ही ऐका.”

  7. ही वाणी झाली, तेव्हा येशू एकटेच त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी काय पाहिले याविषयी शिष्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही.

  8. आणि न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे एकाग्रतेने पाहत असताना त्यांना स्तेफनाचा चेहरा देवदूताच्या चेहर्‍यासारखा दिसला.

  9. चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन यासंबंधाने कळविले होते असे नाही, परंतु आम्ही त्यांच्या वैभवाचे साक्षी आहोत.

  10. त्यांना परमेश्वरपित्याकडून सन्मान आणि गौरव मिळाले, तेव्हा सर्वोच्च गौरवी परमेश्वराकडून अशी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

  11. आम्ही त्यांच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून झालेली वाणी आम्ही स्वतः ऐकली आहे.