Skip to content

Total Abstinence बद्दल बायबलमधील वचने: General references

18 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

  1. मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली,

  2. “तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे,

  3. यासाठी की पवित्र व अपवित्र, शुद्ध व अशुद्ध यातील भेद तुला कळेल.

  4. तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.

  5. जोपर्यंत ते नाजीराच्या नवसाखाली असतील, तोपर्यंत त्यांनी द्राक्षवेलीचा कोणताही उपज, साल व बीज सुद्धा खाऊ नये.

  6. तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस.

  7. याहवेहच्या दूताने मानोहाला उत्तर दिले, “मी तुझ्या पत्नीला जे सांगितले आहे ते सर्व तिने करावे.

  8. तिने द्राक्षाच्या वेलीतून आलेले कोणतेही उपज खाऊ नये, द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये किंवा जे अशुद्ध आहे असे काहीही खाऊ नये. ज्या सर्व आज्ञा तिला दिल्या आहेत त्या तिने पाळाव्या.”

  9. राजाच्या हुकुमानुसार प्रत्येक पाहुण्याच्या मद्य पिण्यावर कोणतेही बंधन नव्हते, राजाने मद्य वाढणाऱ्या अधिकार्‍यांना सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येकाला त्याच्या इच्छेस येईल ते मद्य पिण्याची पूर्ण मुभा होती.

  10. जे अतिमद्यपान करतात किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको,

  11. जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!

  12. शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.

  13. हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही.

  14. परंतु त्यांनी द्राक्षारस घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आम्ही पीत नाही, कारण आमचा पूर्वज, रेखाबचा पुत्र योनादाब याने आम्हाला अशी आज्ञा केली की, आम्ही किंवा आमच्या वंशजापैकी कोणीही कधीही द्राक्षारस पिऊ नये.

  15. त्या शिवाय आम्ही कधीही घरे बांधू नयेत, बीज पेरणी करू नये, द्राक्षमळे लावू नयेत; यापैकी कशाचीही मालकी पत्करू नये, तर आम्ही आजीवन तंबूंमध्येच राहावे. तर ज्या भूमीवर आम्ही विमुक्त म्हणून वसती करू, तिथे दीर्घकाळ राहू.

  16. आम्ही आमचा पिता रेखाबचा पुत्र यहोनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा पाळल्या आहेत. आम्ही, आमच्या पत्नींनी, पुत्रांनी वा कन्यांनी कधीही द्राक्षारस प्याला नाही.

  17. ‘रेखाबचा पुत्र यहोनादाब याने त्याच्या वंशजांना आज्ञा दिली होती की द्राक्षारस पिऊ नये, आणि ही आज्ञा त्यांनी पाळली. त्यांच्या पूर्वजांची आज्ञा पाळण्याकरिता, आजतागायत ते द्राक्षारस पीत नाहीत. मी तुमच्याशी पुन्हापुन्हा बोललो, पण माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत.

  18. तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.