Theocracy बद्दल बायबलमधील वचने: Established
Established बद्दल वचने
तेव्हा सर्व लोक एकत्र प्रतिसाद देत म्हणाले, “जे काही याहवेहने सांगितले, ते सर्व आम्ही करू.” मग मोशेने जाऊन लोकांचे म्हणणे याहवेहला कळविले.
मग मोशेने जाऊन याहवेहचे शब्द व नियम लोकांना सांगितले, त्यांनी एका आवाजात प्रतिसाद देत म्हटले, “याहवेहने जे सर्वकाही सांगितले त्याप्रमाणे आम्ही करू.”
मग मोशेने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांपुढे वाचला. त्यांनी प्रतिसाद दिला, “याहवेहने सांगितले ते सर्वकाही आम्ही करू; आम्ही आज्ञापालन करू.”
परंतु आम्ही का मरावे? त्या भयानक ज्वाला आम्हाला भस्म करून टाकतील आणि याहवेह आमच्या परमेश्वराची वाणी आम्ही ऐकत राहू, तर खात्रीने मरून जाऊ.
कारण जिवंत परमेश्वर अग्नीतून बोलत असताना त्यांची वाणी ऐकून जिवंत राहिला आहे, असा सर्व नश्वर मानवात आमच्याशिवाय कोण आहे?
तेव्हा तुम्ही याहवेह आमच्या परमेश्वराजवळ जा आणि ते जे सांगतील ते सर्व ऐका. मग याहवेह आमच्या परमेश्वराने तुम्हाला जे काही सांगितले आहे ते आम्हाला सांगा. आम्ही ऐकू आणि त्याचे पालन करू.”
तुम्हाला माझ्याशी बोलताना याहवेहनी ऐकले आणि याहवेह मला म्हणाले, “हे लोक जे काही तुझ्याशी बोलले ते मी ऐकले आहे. त्यांनी जे सर्वकाही बोलले ते चांगले आहे.
त्यांचे अंतःकरण मजविषयी नेहमीच असे राहिले आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे भय त्यांच्याठायी नेहमीच राहिले तर किती बरे होईल! असे झाल्यास त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे सदासर्वकाळ कल्याण होईल!
तो म्हणाला: “याहवेह सीनाय पर्वतावरून आले आणि सेईरावर ते सूर्याप्रमाणे उदय पावले; पारान पर्वतावरून ते प्रकाशले. असंख्य पवित्र जनांचा समुदाय त्यांच्याबरोबर होता. दक्षिण दिशेने, त्यांच्या पर्वत उतरणीवरून ते खाली आले.
निश्चित तुम्हीच आपल्या लोकांवर प्रीती करता; सर्व पवित्रजन तुमच्या अधीन आहेत. ते तुमच्या चरणाशी नमन करतात, आणि तुमच्याकडून ते आज्ञा स्वीकारतात,
मोशेने आम्हाला जे नियम दिले, ते नियम याकोबाच्या सभेचे अमोल वतन आहे.
इस्राएलच्या गोत्रांबरोबर जेव्हा इस्राएलच्या लोकांचे पुढारी एकत्र जमले, तेव्हा याहवेह यशुरून लोकांचे राज्यकर्ता झाले.
परंतु गिदोनाने त्यांना म्हटले, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही किंवा माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही. याहवेह तुमच्यावर राज्य करतील.”
“परंतु जेव्हा तुम्ही पाहिले की, अम्मोन्यांचा राजा नाहाश तुमच्यावर आक्रमण करत आहे, तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचा राजा असतानाही, तुम्ही मला म्हणाला, ‘नाही, आमच्यावर राज्य करण्यासाठी आम्हाला राजा पाहिजे.’