The Power of Christ बद्दल बायबलमधील वचने: As the Son of God, is the power of God
As the Son of God, is the power of God बद्दल वचने
येशूंनी त्यांच्या आरोपाला उत्तर दिले व म्हणाले, “माझा पिता या दिवसापर्यंत सतत कार्य करीत आहे आणि मी देखील कार्य करीत आहे.”
या कारणासाठी तर यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यास अधिकच आतुर झाले; कारण त्यांनी शब्बाथ मोडला होता, एवढेच नव्हे, तर त्यांनी परमेश्वराला आपला पिता म्हणून स्वतःला परमेश्वरासमान केले होते.
येशूंनी त्यांना असे उत्तर दिले: “मी तुम्हाला निश्चित सांगतो, पुत्राला स्वतः होऊन काही करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो, तेच तो करतो, कारण जे काही पिता करतो, तेच पुत्रही करतो.
मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही.
ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे; कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही.
मी आणि माझे पिता एक आहोत.”