Skip to content

The First Born बद्दल बायबलमधील वचने

29 वचने · 40 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराने उत्तर दिले, “होय, परंतु तुझी पत्नी साराह हिच्यापासून तुला एक पुत्र होईल आणि तू त्याचे नाव इसहाक असे ठेवावेस. मी त्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशजांबरोबरही अनंतकाळचा करार स्थापित करेन.

  2. इश्माएलाविषयी मी तुझी विनंती ऐकली आहे: मी त्याला निश्चितच आशीर्वाद देईन; त्याला फलद्रूप करेन व बहुगुणित करेन. तो बारा शासकांचा पिता होईल व मी त्याला एक महान राष्ट्र बनवेन.

  3. पण माझा करार मी इसहाकाबरोबर स्थापित करेन. ज्याला पुढील वर्षी याच सुमारास साराह तुझ्यासाठी प्रसवेल.”

  4. नंतर त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या परमेश्वरापुढे माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक विश्वासाने चालले, तेच परमेश्वर आजपर्यंत माझ्या जीवनाचे मेंढपाळ राहिले आहे,

  5. ज्या परमेश्वराच्या दूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, ते या मुलांना आशीर्वादित करोत. माझे आणि माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक यांचे नाव या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो, त्यांना पुष्कळ मुलेबाळे व गोत्र लाभोत.”

  6. त्याच्या पित्याने आपला उजवा हात एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवलेला पाहून योसेफ नाराज झाला आणि त्याने एफ्राईमच्या डोक्यावरील हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवावा म्हणून त्याने त्याच्या पित्याचा हात उचलला.

  7. योसेफ त्याला म्हणाला, “नाही बाबा, हा प्रथम जन्मलेला आहे; तुमचा उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवा.”

  8. परंतु त्याच्या वडिलांनी ते नाकारले आणि ते म्हणाले, “मला माहीत आहे, माझ्या मुला, मला माहीत आहे. त्याचीही कुळे होतील आणि तो देखील महान होईल, परंतु त्याचा धाकटा भाऊ त्याच्याहीपेक्षा थोर होईल आणि त्याचे लोक राष्ट्रांचे समुदाय बनतील.”

  9. त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत: ‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ” अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले.

  10. मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी.

  11. आणि इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घ्यावे आणि इस्राएली लोकांच्या पशूतील सर्व प्रथम जन्मलेल्या वत्सांऐवजी, लेव्याच्या पशूंना माझ्यासाठी घ्यावे. मीच याहवेह आहे.”

  12. याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली.

  13. एक महिना व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषांची एकूण संख्या 22,273 होती.

  14. आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.”

  15. मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले.

  16. इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365 गोळा केले.

  17. याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.

  18. ते आल्यानंतर एलियाबाला पाहून शमुवेलला वाटले, “निश्चितच याहवेहचा अभिषिक्त येथे याहवेहसमोर उभा आहे.”

  19. परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, “त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात.”

  20. नंतर इशायाने अबीनादाबाला शमुवेलसमोर चालविले. परंतु शमुवेलने म्हटले, “याहवेहने यालाही निवडले नाही.”

  21. नंतर इशायाने शम्माहला चालविले, परंतु शमुवेल म्हणाला, “हा सुद्धा याहवेहने निवडलेला नाही.”

  22. इशायाने त्याचे सात पुत्र शमुवेलसमोर चालविले, परंतु शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने यांना निवडले नाही.”

  23. तेव्हा त्यांनी इशायला विचारले, “तुझे पुत्र येण्याचे पूर्ण झाले काय?” इशायाने उत्तर दिले, “अजून एक जो सर्वात लहान आहे, तो रानात मेंढरे राखीत आहे.” शमुवेल म्हणाले, “त्याला बोलाविणे पाठव; कारण तो येईपर्यंत आम्ही बसणार नाही.”

  24. तेव्हा इशायाने त्याला बोलावून आणले. तो तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला देखणा होता. तेव्हा याहवेह म्हणाले, “ऊठ आणि त्याला अभिषिक्त कर, हाच तो आहे.”

  25. “गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.