Skip to content

Talebearer बद्दल बायबलमधील वचने: General references

14 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

  1. “ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये. “ ‘तुमच्या शेजार्‍याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे.

  2. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?

  3. ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;

  4. जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;

  5. चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.

  6. विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.

  7. जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात.

  8. अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.

  9. चहाड्या करणारा विश्वासघात करतो; म्हणून अतिशय बोलणार्‍यापासून दूर राहावे.

  10. लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.

  11. जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो.

  12. अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.

  13. परंतु तरुण विधवांचे नाव अशा यादीत नोंदवू नये, कारण जेव्हा त्यांची विषयवासना ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेपेक्षा प्रबळ होते, तेव्हा त्या विवाह करू पाहतात,

  14. शिवाय, त्या आळशी बनण्यात व घरोघर फिरून गप्पागोष्टी करण्यात आणि इतर लोकांच्या कामकाजात लुडबुड करण्यात आपला वेळ घालविण्याची शक्यता आहे.