मुख्य मजकुरावर जा

Syro-Phenician बद्दल बायबलमधील वचने: The nationality of a woman whose daughter was cured by Jesus.

15 वचने · 1 पैलू

The nationality of a woman whose daughter was cured by Jesus. बद्दल वचने

  1. नंतर येशूंनी तो प्रांत सोडला आणि सोर व सीदोन या प्रांतात गेले.

  2. एक कनानी स्त्री त्या भागातून येशूंकडे आली आणि त्यांना विनवणी करून म्हणाली, “प्रभू, दावीद राजाचे पुत्र, माझ्यावर दया करा! माझी मुलगी भूतग्रस्त झाली असून, ती पुष्कळ छळ सहन करीत आहे.”

  3. पण येशूंनी एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही; तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली, “प्रभूजी, तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागे सारखी ओरडत येत आहे.”

  4. तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाले, “हरवलेल्या इस्राएली मेंढराकडेच मला पाठविले आहे.”

  5. परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”

  6. येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”

  7. “हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “स्वामीच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”

  8. ते ऐकून येशू तिला म्हणाले, “बाई, तुझा विश्वास फार मोठा आहे! म्हणून तुझी विनंती मान्य करण्यात आली आहे.” आणि त्याच क्षणी तिची मुलगी बरी झाली.

  9. नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही.

  10. त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली.

  11. आपल्या कन्येला दुरात्म्याच्या तावडीतून सोडवावे, अशी तिने त्यांच्याजवळ विनंती केली. ती स्त्री ग्रीक असून सुरफुनीकी प्रांतात जन्मली होती.

  12. “प्रथम लेकरांना जेवढे पाहिजे तेवढे खाऊ द्या,” ते म्हणाले, “मुलांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”

  13. “प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”

  14. येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.”

  15. ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता.