मुख्य मजकुरावर जा

Simeon बद्दल बायबलमधील वचने: 3. A devout man in Jerusalem, blesses Jesus in the temple

11 वचने · 3 पैलू

3. A devout man in Jerusalem, blesses Jesus in the temple बद्दल वचने

  1. यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता.

  2. कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.

  3. पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले,

  4. तेव्हा शिमोनाने बाळाला आपल्या हातात घेतले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हटले:

  5. “हे सर्वशक्तिमान प्रभू, तुमच्या वचनाप्रमाणे आता तुमच्या सेवकाला शांतीने घेऊन जावे.

  6. मी तुमचे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.

  7. जे तुम्ही सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहे,

  8. ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएली लोकांचे गौरव आहे.”

  9. आपल्या पुत्राविषयी हे बोलणे ऐकून योसेफ आणि मरीया आश्चर्यचकित झाले.

  10. मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: “इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे.

  11. यावेळी अनेकांच्या हृदयातील विचार उघड केले जातील व तुझ्या जिवातून तलवार भोसकली जाईल.”