Seals बद्दल बायबलमधील वचने: What is dear or valued
What is dear or valued बद्दल वचने
तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव; कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे, तिचा हेवा कबरेप्रमाणे आहे. तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात, ते खरोखर आगीचे लोळच असतात.
“मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,
“ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”