Scribe बद्दल बायबलमधील वचने: Hypocrisy of, reproved by Jesus
Hypocrisy of, reproved by Jesus बद्दल वचने
कारण मी तुम्हाला सांगतो की, परूशी आणि इतर नियमशास्त्र शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक असल्याशिवाय, तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कधीही प्रवेश मिळणार नाही.
तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!”
मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्याकडून आम्हास चिन्ह पाहायचे आहे.”
परूशी आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंकडे येऊन विचारू लागले,
तेव्हापासून, येशू आपल्या शिष्यांना सांगू लागले की त्यांनी यरुशलेमास जाणे, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून अनेक दुःख सहन करणे, जिवे मारले जाणे आणि तिसर्या दिवशी पुन्हा जिवंत होणे हे अगत्य आहे.
“आपण यरुशलेमात जात आहोत आणि तिथे मानवपुत्राला महायाजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि नंतर त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल.
तरी जेव्हा मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षकांनी ही अद्भुत कामे पाहिली आणि लहान मुलांना मंदिराच्या परिसरात, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” असे ओरडतांना ऐकले, तेव्हा ते संतापले.